Akshay Kumar: हेराफेरी 3 बाबत आली मोठी अपडेट; परेश रावल यांच्या वापसीबाबत अक्षय कुमार म्हणतो...

प्रेक्षकांनाही त्यांच्या लाडक्या बाबूभैय्याच्या अशा प्रकारे सिनेमा सोडण्याच्या प्रकाराने धक्का बसला
Entertainment News
हेराफेरी 3pudhari
Published on
Updated on

Paresh Rawal and Akshay kumar in Herapheri 3

जवळपास सगळ्यांचीच आवडती फ्रेंचाईजी हेराफेरीचे 2 भाग येऊन गेले. या दमदार आणि धमाकेदार सीरिजचा तिसऱ्या पार्टची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पण या गोष्टीला एक ग्रहण लागले आहे. तिसऱ्या भागातून परेश रावल यांनी काढता पाय घेतला आहे. प्रेक्षकांनाही त्यांच्या लाडक्या बाबूभैय्याच्या अशा प्रकारे सिनेमा सोडण्याच्या प्रकाराने धक्का बसला.

परेश रावल यांचा निर्णय निर्माता असलेल्या अक्षयला इतका खटकला की हे प्रकरण अगदी 25 कोटींच्या दाव्यापर्यंत पोहोचल. यानंतरही आरोप प्रतीआरोप बरेच झाले. यानंतर अक्षयने पहिल्यांदाच या सिनेमाबाबत सकारात्मक बाजू मांडली आहे.

पिंकविलाशी बोलताना अक्षयने या बाबत सांगितले. जेव्हा त्याला हेराफेरी 3बाबत विचारले गेले तेव्हा तो म्हणाला तुमच्या डोळ्यासामोरच आहे सगळे काही. मीही यासाठी प्रार्थना करतो आहे. मला आशा आहे की सगळे ठीकच होईल.’ पुढे तो म्हणतो सगळे ठीकच होईल मला नक्की खात्री आहे.

परेश रावल यांनी का सोडला हेराफेरी 3

एका इंटरव्ह्युमध्ये परेश यांनी हेराफेरीला त्यांचा गळ्याचा फास बनला आहे असे म्हणले, हेराफेरीमुळे टाइपकास्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कसे आहे अक्षय आणि परेशमधील नाते

अक्षयच्या कंपनीने या गोंधळाबाबत परेश रावल यांच्याविरोधात दावा दाखल केला. याला उत्तर म्हणून परेश रावल यांनी व्याजासाहित सायनिंग अमाऊंट अक्षयला परत केली. तसे पाहता हे दोघे नुकतेच प्रियदर्शनच्या भूतबंगला सिनेमासाठी एकत्र होते. पण त्यांच्यातील नाते पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news