Raja Shivaji Box Office: ‘राजा शिवाजी’ 100 कोटींच्या उंबरठ्यावर; मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचणार, सैराटलाही मागे टाकणार

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी कायम ठेवत भारतात 91 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Raja Shivaji Box Office Collection
Raja Shivaji Box Office CollectionPudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट आता 100 कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई स्थिर राहिल्याने बॉक्स ऑफिसवर त्याची मजबूत पकड कायम असल्याचं दिसत आहे.

तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने अंदाजे 1.50 कोटी रुपयांची कमाई केली. मागील दिवसाच्या तुलनेत कमाईत सुमारे 15 टक्क्यांची घट झाली असली, तरी तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम असल्याचं चित्र आहे. मात्र, दुसऱ्या शुक्रवारीच्या तुलनेत ही कमाई जवळपास 60 टक्क्यांनी कमी झाली आहे.

आतापर्यंत ‘राजा शिवाजी’ने भारतात एकूण 91 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. जर सध्याचा ट्रेंड कायम राहिला, तर तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट जवळपास 96 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

Raja Shivaji Box Office Collection
Mohsin Naqvi: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? IPL Final आधी मोठी अपडेट समोर

यामुळे पुढील काही दिवसांत, विशेषतः मंगळवारपर्यंत ‘राजा शिवाजी’ 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर हा टप्पा पार झाला, तर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ही एक मोठी घटना ठरेल.

मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचण्याची संधी

आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाला भारतात 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठता आलेला नाही. याआधी ‘सैराट’ आणि ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या चित्रपटांनी या आकड्याजवळ मजल मारली होती, पण 100 कोटींचा आकडा ओलांडता आला नव्हता.

Raja Shivaji Box Office Collection
CJI Surya Kant: ‘तरुणांना झुरळ म्हटलं नाही’; वादानंतर CJI सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण, माध्यमांवर चुकीच्या रिपोर्टिंगचा आरोप

‘राजा शिवाजी’च्या यशामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाचा हिंदी डब व्हर्जन. याआधीचे मराठी सुपरहिट चित्रपट मुख्यतः महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले होते. मात्र, ‘राजा शिवाजी’ हिंदीतही प्रदर्शित होऊन महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. यामुळे उत्तर भारतासह इतर भागांतूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘राजा शिवाजी’ची आतापर्यंतची कमाई

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने जोरदार कमाई करत दमदार सुरुवात केली. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली पकड ठेवली आणि तिसऱ्या आठवड्यातही कमाई सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news