Raja Shivaji Box Office Day 3: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! अवघ्या 3 दिवसांत कमाईचा नवा विक्रम; किती कोटी कमावले?

Raja Shivaji Box Office Day 3: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत तीन दिवसांत 33.90 कोटी रुपये कमावले आहेत.
Raja Shivaji Box Office Day 3
Raja Shivaji Box Office Day 3Pudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Box Office Day 3: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक देत अवघ्या तीन दिवसांत कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित हा ऐतिहासिक चित्रपट १ मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा होती आणि आता प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग घेत 11.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी थोडी घसरण झाली असली तरी शनिवारी चित्रपटाने 10.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र रविवारी सुट्टीचा मोठा फायदा चित्रपटाला मिळाला आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 12 कोटी रुपयांची कमाई झाली. यामुळे ‘राजा शिवाजी’ची तीन दिवसांची एकूण कमाई 33.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री आणि जेनेलिया डिसूझा यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच सलमान खानच्या खास कॅमिओचीही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

Raja Shivaji Box Office Day 3
Nagraj Manjule Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’मधून नागराज मंजुळे बाहेर का पडले? रितेश देशमुखने सांगितलं खरं कारण

विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘ठाकरे’, ‘टाइमपास’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटांच्या कमाईलाही ‘राजा शिवाजी’ने मागे सोडले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘राजा शिवाजी’ची जोरदार चर्चा असून येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठे विक्रम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Raja Shivaji Box Office Day 3
West Bengal Election Results 2026 Live: बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार अडचणीत, भाजपची मोठी आघाडी

भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट (कमाईचा डेटा)

  • सैराट - 80.98 कोटी

  • बाईपण भारी देवा - 76.28 कोटी

  • वेड - 61.20 कोटी

  • नटसम्राट - 42 कोटी

  • पावनखिंड - 37.72 कोटी

  • लय भारी - 37 कोटी

  • कट्यार काळजात घुसली - 35 कोटी

  • राजा शिवाजी - 33.90 कोटी (तीन दिवसांचे संकलन)

  • ठाकरे - 31.6 कोटी

  • टाईमपास - 30 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news