Raja Shivaji Free Screening: ‘राजा शिवाजी’ चित्रपट फ्रीमध्ये पाहता येणार; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

Raja Shivaji Free Screening: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील विविध चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.
Raja Shivaji Free Screening
Raja Shivaji Free ScreeningPudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Free Screening: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राज्यभरात प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून अनेक चित्रपटगृहांबाहेर गर्दी दिसत आहे. अशातच महाराष्ट्र दिनानिमित्त काही ठिकाणी हा चित्रपट नागरिकांना मोफत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि सिनेरसिकांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खान जिवा महालाच्या भूमिकेत झळकत आहेत. चित्रपटात संजय दत्त, जेनेलिया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोठ्या स्टारकास्टमुळे आणि ऐतिहासिक विषयामुळे चित्रपटाची चर्चा देशभरात होत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून राज्यभरात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावरून अनुभवता यावा, असा असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील निवडक चित्रपटगृहांमध्ये हे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.

Raja Shivaji Free Screening
Raja Shivaji X Reviews: अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी... रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट कसा आहे?

मुंबईतील वरळी परिसरातील फिनिक्स पॅलेडियम येथे दुपारी विशेष शो आयोजित करण्यात आला असून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरूनही या मोफत प्रक्षेपणाची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Raja Shivaji Free Screening
Somnath Avghade: ‘माझा फोटो परवानगीशिवाय वापरला’; युट्यूब चॅनलवर सोमनाथ अवघडे संतापला, कायदेशीर कारवाईचा इशारा

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावरही ‘राजा शिवाजी’बाबत मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना रितेश देशमुख यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तर सलमान खान यांच्या छोट्या पण प्रभावी भूमिकेचीही चर्चा रंगली आहे. अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट ऐतिहासिक आणि भावनिक अनुभव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत शोमुळे अनेकांना कुटुंबासह चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये आणखी गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news