Parineeti Chopra welcome Baby boy: परिणीतीची प्रसुती नंतर पहिली पोस्ट, बाळाविषयी लिहिलं...

Raghav Chaddha-Parineeti Chopra welcome Baby boy: परिणीतीची प्रसुती नंतर पहिली पोस्ट, बाळाविषयी लिहिलं...
image of Parineeti Chopra
Parineeti Chopra welcome Baby boyINSTAGRAM
Published on
Updated on

Parineeti Chopra Raghav Chaddha welcome Baby boy

मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra Baby)ने गोंडस बाळाला दिला आहे. मुलाच्या जनमाआधी ती दिल्ली आली होती. रविवारी सकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर राघव चड्ढा आणि परिणीते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत आनंदाची वार्ता दिली. पोस्ट शेअर करताच राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रातून तसेच फॅन्सकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.

अभिनेत्री परिणीतीने आई झाल्यानंतर एक पोस्टर शेअर करत मुलाला जन्म दिल्याचे सांगितले. शिवाय कॅप्शन मध्ये तिने evil eye चा इमोजी शेअर केला. दीपावलीच्या शुभ निमित्ताने त्यानी आपल्या बाळाचे स्वागत केले आहे.

image of Parineeti Chopra
The Taj Story Trailer | मंदिर की मकबरा? द ताज स्टोरीच्या ट्रेलरमधून वादाला फुटले तोंड, उघडणार २२ बंद खोल्यांचे रहस्य

परिणीती-राघवने काय लिहिलं?

पोस्ट शेअर करत परिणीतीने लिहिलं- आमचे हात भरलेले आहेत, आमची हृदये आणखी भरून आलेली आहेत.”

कपलने लिहिलं, "अखेर तो आला!...आमचा लहान पाहुणा...आणि आम्हाला खरंच आधीचे आयुष्य आठवत नाहीये. आधी आम्ही फक्त एकमेकांसाठी होतो, आता आमच्याकडे सर्वकाही आहे...आभार, परिणीती आणि राघव."

image of Parineeti Chopra
Hindi Serial Update: क्यो की सास भी.. की अनुपमा? या आठवड्यात कुणी बाजी मारली?

ऑगस्टमध्ये केली होती प्रेग्नेंसीची घोषणा

याआधी कपलने २५ ऑगस्ट, २०२५ रोजी आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. कपलने एका पिवळ्या रंगाच्या केकचा फोटो शेअर केला होता, ज्यावर बाळाच्या पायांचे निशाण होते. त्यावर लिहिलं होतं-"1 + 1 = 3". त्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये परिणीती राघव एका बागेत फिरताना दिसत होते.

या कपलची लव्ह स्टोरी मे २०२३ मध्ये सर्वश्रुत झाली होती. जेव्हा तयांनी नवी दिल्लीच्या कपूरथळा हाऊसमध्ये आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये विवाह केला. लग्नात एका खासगी सोहळ्यात परिवारातील जवळचे सदस्य आणि मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील मित्रमंडळी सहभागी झाले होते. ऑगस्टमध्ये द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावल्यानंतर राघव यांनी कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याचे संकेत दिले होते. राघव म्हणाले होते- "देऊ, तुम्हाला देऊ... लवकरच खुशखबर देऊ."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news