
टेलिव्हिजन विश्वात सध्या दोन तगडया मालिका नंबर वनच्या पदासाठी मोठी फाईट करताना दिसत आहेत. या दोन्ही मालिकांचा स्वत:चा खास असा प्रेक्षक वर्ग आहे. कुटुंब आणि स्वत: या संघर्षात अडकलेली अनुपमा की एकत्र कुटुंबाला सांधताना कस लागलेली तुलसी. या दोघींपैकी टीआरपीच्या जगात कोण बाजी मारते याची उत्सुकताही सगळ्यांना आहे.
रुपाली गांगुलीची मुख्य भूमिका असलेली अनुपमा मालिका जवळपास चार आठवडे आपले पहिले स्थान टिकवून आहे. अनुपमा या आठवड्यात 2.4 टीआरपी मिळाला आहे.
या आठवड्यात क्यो की दुसरे स्थान मिळवले आहे. तुलसीच्या या शोची थोडी पिछेहाट झाली असून तिला 2.1 टीआरपी रेटिंग मिळाले आहे.
यावेळी तिसऱ्या क्रमांकावर आहे ये रिश्ता क्या कहलाता है हा शो. या मालिकेला 1.9 या टीआरपीवर समाधान मानावे लागले आहे.
या यादीत असलेला नवीन शो म्हणजे तूम से तुम तक. या आठवड्यात या मालिकेने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. या मालिकेला 1.8 इतका टीआरपी मिळाला आहे.