Srivalli Marathi : ‘ओ अंतवा’ नंतर रागिणीचे मराठी ‘श्रीवल्ली’ व्हायरल (Video)

srivalli
srivalli

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपटातील गाणी आजही मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. शिवाय या गाण्याचे विविध भाषांमध्ये व्हर्जन पाहायला मिळाले आहेत. (Srivalli Marathi) पण, गायिका रागिणी कवठेकरच्या आवाजातील श्रीवल्ली हे दमदार गाणं ठरलं आहे. याचं कारण म्हणजे, हे गाणं पुष्पा चित्रपटातील गाण्याची अधिकृत म्युझिक कंपनी आदित्य म्युझिकने खास मराठीमध्ये सादर केलं आहे. रागिणी कवठेकरच्या 'ओ अंतवा' या मराठी फिमेल व्हर्जन गाण्याची प्रसिद्धी पाहता, श्रीवल्ली देखील गाणं खास ठरेल, यामध्ये शंका नाही. (Srivalli Marathi)

खरंतरं श्रीवल्लीसाठी असलेलं हे गाणं, मराठीमध्ये खुद्द श्रीवल्लीच आपल्या 'पुष्पा'साठी गात आहे, असे दिसून येते. या गाण्याचे शब्दांकन शशांक कोंडविलकर यांनी केलं आहे. साऊथ सिनेमातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रचलित असलेल्या आदित्य म्युझिक युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news