

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पाचे (करूणा पांडे) जीवन सतत संघर्षांनी भरलेले राहिले आहे आणि या संघर्षांचा सामना करत ती नेहमीच आव्हानांवर मात करत आली आहे. आगामी आठवड्यांमध्ये सोनी सबवरील मालिका 'पुष्पा इम्पॉसिबल'मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
पुष्पाची दागिने हरवण्याची स्थिती शहरातील चर्चेचा विषय बनते. पुन्हा एकदा नशीबाने तिच्यासमोर दिप्तीची (गरिमा परिहर) आजी कुंजबाला सोबतच्या (केतकी दवे) आमना-सामन्यासह आव्हानात्मक स्थिती निर्माण केली आहे. पुष्पाकडे स्पष्टीकरण देण्यासाठी शब्दच नसतात. कारण पुष्पाने विवाहाची भेट म्हणून दिप्तीला देण्यास ठेवलेले दागिने कुंजबालाने पाहिलेले असतात.
एका स्थितीमधून दुसरी स्थिती निर्माण होते आणि दुविधा अधिक वाढत जाते, जेथे कुंजबालाच्या निदर्शनास येते की, पुष्पाने दिप्तीला दिलेले दागिने हे कुंजबालाने पुष्पाला दिलेल्या दागिन्यांसारखे असतात. कुंजबाला जरादेखील वेळ वाया न घालवता विवाह स्थळी येते आणि विवाह थांबवते. कुंजबाला विवाह स्थळी पुष्पाचा अपमान करते आणि तिला फसवणूक करणारी म्हणते, ज्यामुळे स्थिती अधिक गंभीर होऊन जाते.
करूणा पांडे ऊर्फ पुष्पा म्हणाली, "पुष्पाच्या जीवनात सतत आव्हाने येत आहेत आणि आपल्या तार्किक दृष्टिकोणासह ती सामना केलेल्या प्रत्येक संघर्षासाठी उपाय शोधण्यामध्ये नेहमीच यशस्वी ठरली आहे; पण यावेळी तिला कुंजबालाच्या रागाबाबत चिंता आहे. कारण दिप्तीला भेट म्हणून देण्यात येणारे दागिने चोरीला जातात. पुष्पा या स्थितीला कशाप्रकारे हाताळते हे पाहणे रोचक असणार आहे.''
अश्विनची भूमिका साकारणारा नवीन पंडित देखील या पुढील टप्प्याबाबत उत्सुक आहे. तो म्हणाला, "दिप्ती व अश्विनचा विवाह हा सध्याच्या कथानकामधील बहुप्रतिक्षित क्षण आहे. सर्वत्र आनंदमय साजरीकरणाचे वातावरण असताना अनपेक्षित घटना घडते आणि पुष्पा या आव्हानांचे कशाप्रकारे निराकरण करते हे पाहणे रोमांचक असणार आहे.''
हेही वाचा :