मॅडोक फिल्म हॉरर युनिव्हर्सचा नवा सिनेमा थामा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. हॉरर कॉमेडी जॉनरचा हा या युनिव्हर्सचा पाचवा सिनेमा आहे. सुरुवातीपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून हॉरर कॉमेडीसोबतच या सिनेमाला रोमॅंटिक तडकाही लागला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला 'स्त्री' श्रद्धानेही हजेरी लावली होती. (Latest Entertainment News)
2 मिनिटे 54 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वेताळ, भेडिया आणि वॅम्पायर दिसून येतात. आयुष्मान आणि रश्मिकाची लव स्टोरी आकार घेत आहे असे वाटतानाचा त्यात होते वेताळ असलेल्या नवाजुद्दीची एंट्री.
आता या सिनेमात वेताळ आणि वॅम्पायर असलेल्या नवाजुद्दीनमधील संघर्षही पाहायला मिळतो आहे. या सिनेमाबाबत दिनेश विजन बोलताना म्हणतात की हा सिनेमा या युनिव्हर्सचा पहिला रोमॅंटिक सिनेमा आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सिनेमात लव्हस्टोरी दाखवली गेली नव्हती.
थामा या युनिव्हर्सचा पाचवा सिनेमा आहे. यापूर्वी स्त्री, भेडिया, मुंज्या आणि स्त्री 2 या सिनेमांनी स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आता यात थामाची भर पडली आहे.
या सिनेमात श्रद्धा आणि वरुण धवनचा कॅमीयो असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण या सिनेमाच्या सुरुवातीलाच स्त्री आणि भेडिया या सिनेमांचे नावही दिसते. त्यामुळे हा हॉरर कॉमेडी सिनेमा आपल्या आधीच्या दोन लोकप्रिय व्यक्तिरेखांना पडद्यावर दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोण कोण दिसणार या सिनेमात?
या सिनेमात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिका आहेत. तसेच या सिनेमात परेश रावल आणि फैसल मलिक हे देखील दिसणार आहेत.
थामाचे दिग्दर्शन कुणाचे आहे?
आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
थामा कधी रिलीज होणार?
दिवाळीच्या दिवसात म्हणजे 21 ऑक्टोबरला थामा रिलीज होणार आहे