Gurmeet Maan Death: आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू; निधनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
पंजाबी संगीत क्षेत्रावर सध्या शोककळा पसरली आहे. गायक राजवीर जावंदा यांच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आणखी एक पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. (Latest Entertainment News)
प्रसिद्ध पंजाबी लोकगीत गायक गुरुमीत मान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अजून समोर आले नाही. ते आपल्या खास आवाज आणि गीतांसाठी ओळखले जातात. याशिवाय त्यांची पंजाब पोलिसमध्येही काम केले आहे.
त्यांच्या गाण्याची प्रसिद्धी पंजाब बाहेरही होती. प्रीत पायल यांच्या सोबतीने त्यांनी अनेक यशस्वी गाणी गायली आहेत. त्यांची गाणी आजही अनेक कार्यक्रमात आवडीने गायली जातात. गुरमित मान पंजाब पोलिसमध्येही चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जात होते.
काही दिवसांपूर्वी राजवीर जावंदा यांचेही निधन
लोकप्रिय पंजाबी गायक राजवीर जवंदा याचा शिमल्याला जाताना अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याच्या निधनानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच गुरमीत यांचे निधन झाले आहे.

