पुन्हा कर्तव्य आहे : वसू आणि आकाशची भेट होऊ शकेल का?

पुन्हा कर्तव्य आहे
पुन्हा कर्तव्य आहे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुन्हा कर्तव्य आहे' या नवीन मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. वसूच्या नर्सरीमध्ये तक्रारीसाठी आलेल्या अखिलची भेट बनीशी होते. पण बनी त्यांना हाकलून लावतो. अखिल वैतागून आकाशाकडे तक्रार करतो या कारणांनी वसू आणि आकाश समोरासमोर येतात. पण वसूने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला असल्याकारणाने आकाश वसूचा चेहरा बघू शकत नाही. दोघांमध्ये पहिल्याच भेटीत वाद निर्माण होतात. अशातच वसुसाठी स्थळ आलं आहे. वसूचे सासू सासरे वसूला खोटं सांगून मुलाला भेटायचा प्लॅन करतात. वसुला घेऊन सुधीर आणि सुशिला मॉलमध्ये पोहचतात. त्याच वेळेस आकाशही मॉलमध्ये साडी घ्यायला आला आहे. चुकून सुशिला आकाशला तो मुलगा समजते. या झालेल्या गैरसमजातून वसू आणि आकाशमध्ये संभाषण होईल? की ही भेटसुद्धा अपुरीच राहील?

या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी 'पुन्हा कर्तव्य आहे' रोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news