बेंगळुरू पोलिसांनी कन्नड अभिनेता दिग्दर्शक, निर्माता बी हेमंतकुमारला अटक केली आहे. एक टेलिव्हिजन अभिनेत्रीने हेमंतकुमार यांच्यावर लैंगिक शोषण, फसवणूक, धमकी आणि ब्लॅकमेलचा आरोप लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंतने 2022 मध्ये अभिनेत्रीशी संपर्क केला. (Latest Entertainment News)
त्यावेळी 3 या सिनेमात काम करण्याची ऑफर हेमंतने तिला दिली होती. यासाठी 2 लाख रुपये फी देण्याचे ठरले होते. यामध्ये 60000 (साठ हजार) आधीच दिले गेले. यानंतर हेमंतने शूटिंगसाठी टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच तोकड्या कपड्यात शूटिंग करण्यास सांगितले गेले.
ज्यावेळी तिने या प्रकाराला विरोध केला त्यावेळी त्याने शिवीगाळ केली तसेच तिला धमकीही दिली.
याशिवाय अभिनेत्रीचा दावा आहे की 2023 मध्ये मुंबईतील एका इवेंटदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध टाकून तिचा व्हीडियो बनवला गेला आणि ते फुटेज वापरुन तिला ब्लॅकमेलही केले गेले.
याशिवाय हेमंतने तिच्या आईला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच शिवाय तिला गुंडांकरवी त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हणले आहे.
याशिवाय हेमंतवर अजून एक गंभीर आरोप आहे की, त्यांनी सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेताच सिनेमाचे काही भाग सोशल मिडियावर पोस्ट केले.
हेमंतवर पोलिसांनी अभिनेत्रीची सार्वजनिक बदनामी करणे, व्यक्तिगत माहिती जाहीर करणे या आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत.