

रिषभ शेट्टीच्या कांतारा 1 ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले होते. आता या सिनेमाच्या चॅप्टर 1 म्हणजेच प्रीक्वेलनेही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. समीक्षकांनीही या सिनेमांच्या एकूणच सगळ्या गोष्टींचे कौतुक केले आहे. पण अलीकडेच या सिनेमाच्या संदर्भातील एक व्हीडियो व्हायरल झाला होता. त्यामुळे या सिनेमाबाबतचा वाद उफाळून आला. (Latest Entertainment News)
या सिनेमाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्क्रीनिंग दरम्यान अनेक हौशी फॅन्सनी सिनेमातील दैवच्या वेशात हजेरी लावली आहे.
पण सिनेमाच्या मेकर्सना हे वेड फारसे रुचलेले दिसत नाही. त्यांनी सोशल मिडियातवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी हे दोन्ही सिनेमे निर्मितीमागची प्रेरणा सांगितली आहे.
आपल्या पोस्टमध्ये मेकर्स म्हणतात, ‘हे दोन्ही सिनेमे दोन्ही देवतांचा महिमा आणि सन्मान पडद्यावर दाखवण्यासाठी बनवले गेले आहेत. त्याला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादासाठी आभार. या सिनेमांच्या माध्यमातून तुळू संस्कृति आणि वारसा सगळ्यांसामोर मांडण्यात यशस्वी झालो आहे.
या दोन्ही सिनेमांचे विषय अतिशय संवेदनशील असून तुळू लोकांच्या भावना आणि श्रद्धेशी जोडले गेले आहेत. होंबाळे सिनेमा चाहत्यांना अत्यंत सशक्त आणि जाणतेपणे आवाहन करतो आहे की दैवची वेशभूषा करून सार्वजनिक ठिकाणी असलेला वावर टाळावा. किंवा केवळ मनोरंजनात्मक हेतूने ही वेशभूषा करू नये. दैवाराधनेचे पवित्र स्वरूप नेहमीच जपले पाहिजे. प्रेक्षकांनी या सिनेमाचे आध्यात्मिक महत्त्व ओळखावे आणि जबाबदारीने वागावे, जेणेकरून आम्ही ज्या भक्तीचा गौरव करण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी कधीही तडजोड केली जाणार नाही किंवा तिला हलके मानले जाणार नाही.’
कांतारा 1 आतापर्यंत कन्नड, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्लिश या भाषांत रिलीज झाला आहे. सॅकनिकच्या अहवालानुसार कांतारा 1 अलीकडेच 300 कोटी क्लबमध्ये पोहोचला आहे. या सिनेमात रिषभ शेट्टीसह रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैय्या मुख्य भूमिकेत आहेत.