अ‌खेर सुबोध भावेची ‘फुलराणी’ सापडली

subodh bhave - priya
subodh bhave - priya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मिडीयावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोधला टॅग करून 'सुबोध 'कोण आहे तुझी फुलराणी?' हे विचारून या उत्सुकतेमध्ये आणखी भर पाडली. नेटकऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत 'फुलराणी कोण'? याचे अंदाज बांधले. आणि 'फुलराणी' आज रंगमंचावर अवतरली. तिला पाहून चिडवणाऱ्याला 'फुलवाली नाय फुलराणी' असं ठणकावून सांगणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर अवतरली.  २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'फुलराणी' चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, 'पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. 'फुलराणी'तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं असल्याची भावना प्रियदर्शनीने व्यक्त केली'. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही 'फुलराणी' मी साकारली आहे. 'प्रियदर्शिनी ते शेवंता' बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाला.
'फुलराणी'साठी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या गाजलेल्या दृश्याचं ऑडिशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं आणि बऱ्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही 'फुलराणी'साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला.

आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कॅाल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण फिल्म मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वास सरांनी मला ही संधी दिल्याचे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच 'फुलराणी' बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली 'फुलराणी' म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेंसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत. यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. 'फुलराणी' बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं असंही प्रियदर्शनी म्हणाली.

'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली 'माय फेअर लेडी' म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली 'फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी' हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची आहेत संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.
२२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 'फुलराणी' प्रदर्शित योणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news