अभिनेत्री प्रिया बेर्डेचे ‘या’ चित्रपटातून कमबॅक, प्राजक्ता माळीसोबत…

bhishi mitra mandal
bhishi mitra mandal

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून "भिशी मित्र मंडळ" या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे.

अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र यांचे दिग्दर्शन आहे. संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news