‘डिलिव्हरी बॉय’ साजरे करणार डोहाळे जेवण, ‘तू आई होणार’ गाणे पाहा

डिलिव्हरी बॉय
डिलिव्हरी बॉय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील 'तू आई होणार' हे नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील आणि आठ गर्भवती महिलांवर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय कलरफुल आहे. खूपच सुंदर बोल असणारे हे गाणे डोहाळे जेवणाचे असून हे सुरेल गाणे आर्या आंबेकरने गायले आहे. तर या गाण्याला प्रशांत मदपुवार यांचे अर्थपूर्ण बोल आणि चिनार – महेश यांचे संगीत लाभले आहे. अंकिताही 'तू आई होणार' या गाण्यातून एका वेगळ्याच लूकमध्ये समोर आली आहे. हे गाणे जितके श्रवणीय आहे तितकेच त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट आहे.

संबंधित बातम्या –

गाण्याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " डोहाळेजेवण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. यानिमित्ताने स्त्रिया आपले कोडकौतुक पुरवून घेतात. या गाण्यातही तेच दाखवण्यात आले आहे. हे गाणे चित्रित करताना सगळ्यांनीच धमाल केली आहे. गाण्याचे बोल, संगीत, गायन ही खूपच सुंदर भट्टी जमून आली आहे."

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत. फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news