

लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परब लवकरच ‘गोट्या गँगस्टर’ या आगामी चित्रपटात एक नवीन आणि दमदार अवतार घेताना प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' लवकरच भेटीला येणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात होणारी धमाल चित्रपटात पाहता येणार आहे.
'हे' असतील कलाकार
टीझरच्या काही सीनमध्ये प्रथमेश परब डॅशिंग लूकमध्ये दिसतो. या चित्रपटात प्रथमेशसोबत प्रवीण तरडे, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे कलाकार दिसणार आहेत. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित 'गोट्या गँगस्टर' या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
काय आहे चित्रपटाची कहाणी?
आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्याचवेळी काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्याप्रसंगी विनोदी, भन्नाट संवाद, धुमाकूळ चित्रपटात दिसणार आहे.
याआधी राजेश पिंजानी यांनी 'बाबू बँड बाजा' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी पिंजानी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण 'गोट्या गँगस्टर' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला आहे. गोट्या गँगस्टर आता २६ डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.