

रितेश देशमुखच्या वाढदिवशी जेनेलियाने शेअर केलेले ब्लॅक अँड व्हाईट रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. भावनिक पोस्ट सह पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा आज 17 डिसेंबर रोजी ४७ वा वाढदिवस आहे
त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत
ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दोघांनी रोमँटिक पोजेस दिल्या आहेत
जेनेलियाने रितेश देशमुखसाठी लिहिलेली भावूक पोस्ट आहे. ''इतकी वर्षं एकत्र असूनही ते अविभाज्य आणि आनंदी कसे आहेत, याचं श्रेय ती पूर्णपणे रितेशला देते.''
''रितेश हा तिच्यासाठी प्रेम, कृपा आणि आधार आहे; जो तिला हसवतो, रडताना प्रत्येक अश्रू पुसतो आणि प्रत्येक क्षणी तिच्यासोबत उभा राहतो''
''लोकांशी नातं जोडण्याची त्याची खास पद्धत, सोन्यासारखं हृदय आणि २४ तास ७ ही दिवस सोबत.. तो तिच्यासाठी अत्यंत खास आहे.''
''वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून जेनेलियाने रितेशला केवळ जोडीदार नाही, तर तिच्या आयुष्याचा आधारस्तंभ आणि हृदयाची ठोके असल्याचं व्यक्त केलं आहे.''
''माझे हृदय तुझ्याकडे आहे, ते फक्त तुझ्यापाशी सुरक्षित ठेव,'' असे म्हणत तिने खास पोस्ट लिहिली आहे