KGF डायरेक्टरसोबत Jr NTR चा ड्रॅगन, बर्थडेला मिळाले अनोखे गिफ्ट

Jr NTR
Jr NTR
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरआरआर स्टार ज्यु. एनटीआरचा आज २० मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाला फॅन्सना नवं गिफ्टम मिळाले आहे. ज्यु. एनटीआर यांचा पुढील चित्रपट NTR 31 चे नाव ड्रॅगन सांगितले जात आहे. या चित्रपटाची शूटिंग डेट समोर आली आहे. आज ज्युनियर एनटीआर आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आणि या निमित्ताने त्याला सोशल मीडियावर खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर फॅन्स आणि सेलेब्रिटी सोशल मीडियावर बर्थडे विश करत आहेत. या निमित्ताने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता ज्युनियर एनटीआरने फॅन्सर्न रिटर्न गिफ्ट केलं आहे.

नव्या चित्रपटाचे काय आहे नाव?

त्याचा आगामी चित्रपट प्रशांत नील दिग्दर्शित करत आहेत. प्रशांत नील यांनी याआधी केजीएफ दिग्दर्शित केला होता. आता या चित्रपटाची शूटिंग डेट समोर आली आहे. या चित्रपटाचे नाव ड्रॅगन म्हटले जात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ज्यु. एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतीक्षित चित्रपट देवरा पार्ट १ चे पहिले गाणे 'फियर' १९ मे रोजी रिलीज झाला होता. आता देवराचे निर्माते आणि मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरच्या निर्मात्यांसमवेत अनेक चित्रपट निर्मात्यांनी अभिनेता ज्यु. एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फॅन्समध्ये एनटीआरची क्रेझ

एका व्हिडिओमध्ये जपानमध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. तर अमलापुरममध्ये एनटीआरच्या फॅन्सनी ज्यु. एनटीआरच्या फोटोसमोर नारळ फोडले आणि सेलिब्रेशन केलं. तर सुदर्शन चित्रपटगृह येथे त्याचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.

ज्यु. एनटीआर आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात गेला आहे. तेथून काही फोटोज व्हायरल झाले आहेत.

अधिक वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news