Praneet More Controversy |'३७० रुपयांची बिर्याणी' वाद भोवला; कॉमेडियन प्रणीत मोरेने इन्स्टाग्राम अकाऊंट केले 'डीॲक्टिव्हेट'

Praneet More Controversy |चौफेर टीकेनंतर माफीनामाही केला पोस्ट
Praneet More Controversy
कॉमेडियन प्रणीत मोरेने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डीॲक्टिव्हेट (निष्क्रिय) केल्याचे समोर आले आहे.Pudhari
Published on
Updated on

Praneet More Controversy : व्हायरल झालेल्या '३७० रुपयांची बिर्याणी' या क्राउडवर्क क्लिपवर चौफेर टीकेनंतर कॉमेडियन प्रणीत मोरेने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डीॲक्टिव्हेट (निष्क्रिय) केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून इंटरनेटवर वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे.

@rjpranit 'डीॲक्टिव्हेट'

'३७० रुपयांच्या बिर्याणी'वरून सुरू असलेला वाद आणि वाढता संताप लक्षात घेता, कॉमेडियन आणि 'बिग बॉस १९'चा स्पर्धक प्रणीत मोरे याने आपले एक इन्स्टाग्राम अकाऊंट डीॲक्टिव्हेट केल्याचे दिसते. त्याच्या एका स्टँड-अप शोमधील व्हायरल क्लिपवर नेटकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, त्याचे मुख्य इन्स्टाग्राम प्रोफाईल (@rjpranit) आता सोशल मीडियावर उपलब्ध नाही. प्रणीतचे दुसरे इन्स्टाग्राम अकाऊंट '@maharashtrianbhau' अजूनही सक्रिय असून त्याचे १ मिलियनहून (१० लाख) अधिक फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटवर तो नियमितपणे मराठी स्टँड-अप कॉमेडीचे व्हिडिओ शेअर करत असतो.

Praneet More Controversy
Controversy : प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील विधानावरून गदारोळ! महिलांवर अश्लील टीप्पणी करणा-या तरुणाची नोकरीमधून हकालपट्टी

काय आहे वाद?

प्रणीत मोरेच्या शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हिमांशू जांगरा नावाचा तरुणाने 'डेट'चा अनुभव शेअर करताना सांगताना दिसत आहे. एका तरुणीसोबत जेवायला गेल्याचे सांगत त्याने नमूद केले की, त्या दोघांनी मिळून सुमारे ३६० ते ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली. जेवणानंतर जेव्हा तरुणीने त्याला घरी सोडण्याची विनंती केली, तेव्हा हिमांशूने तिला नकारार्थी उत्तर दिले. व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना ऐकू येत आहे की, ‘मी तिला म्हणालो, यार ३७० रुपये खर्च झाले आहेत, ते तर मी वसूल करणारच.’

Praneet More Controversy
Sara Tendulkar Post : ताहीर हे किळसवाणं आहे... सारा 'त्या' फोटोवरून जाम भडकली, म्हणाली ही पत्रकारिता नाही

सोशल मीडियावर त्‍या वक्तव्यावर तीव्र आक्षेप

या वक्तव्यावर सोशल मीडिया युजर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि कन्टेन्ट क्रिएटर्सनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. त्यांनी त्या प्रेक्षकाच्या वक्तव्याचा आणि हा संवाद इंटरनेटवर पोस्ट करण्याच्या प्रणीतच्या निर्णयाचा कडाडून निषेध केला.

Praneet More Controversy
Somnath Avghade: ‘माझा फोटो परवानगीशिवाय वापरला’; युट्यूब चॅनलवर सोमनाथ अवघडे संतापला, कायदेशीर कारवाईचा इशारा

हिमांशू जांगराची कंपनीने केली हकालपट्टी

हिमांशू जांगरा हा गुरुग्राममधील 'स्टार्विक डिझाईन' या नामांकित डिझायनिंग कंपनीत कार्यरत होता. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्‍यात आला. वाद खूप वाढल्यानंतर हिमांशूने माफी मागितली आणि त्यानंतर आपले सोशल मीडिया अकाऊंट्स डीॲक्टिव्हेट केले. एवढेच नाही तर या वादाचा फटका त्याच्या नोकरीलाही बसला. सोशल मीडियावरील वाढता विरोध आणि कंपनीच्या प्रतिमेला पोहोचणारा धक्का लक्षात घेऊन कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करत हिमांशूला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची घोषणा केली आहे.

Praneet More Controversy
Coldplay kiss-cam Controversy: तो माझ्याशी खोटं बोलला... 'किस' प्रकरणात दिसतं त्यापेक्षा वास्तव वेगळं; HR चे CEO वर गंभीर आरोप

प्रणीत मोरेने मागितली माफी

हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी प्रणीतवर टीका केली. प्रेक्षकाच्या त्या चुकीच्या वक्तव्याला विरोध करण्याऐवजी प्रणीत स्वतः हसला आणि त्याने ती क्लिप सोशल मीडियावर शेअर करून अशा चुकीच्या मानसिकतेचे उदात्तीकरण केले, असा आरोप अनेक इन्फ्लुएन्सर्सनी केला. हा वाद सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरला आणि नेटकऱ्यांनी त्या प्रेक्षक आणि कॉमेडियन दोघांवरही कारवाईची मागणी केली. या टीकेनंतर प्रणीत मोरेने इन्स्टाग्रामवर एक माफीनामा पोस्ट केला होता. त्याने लिहिले, "नुकत्याच व्हायरल झालेल्या क्राउडवर्क क्लिपबाबत होत असलेली टीका मी पाहिली आहे. त्या प्रेक्षकाने केलेले वक्तव्य हे माझे वैयक्तिक विचार दर्शवत नाही. आता मागे वळून पाहताना मला जाणवते की, मी त्या गोष्टीवर हसून पुढे जाण्याऐवजी त्याच्या त्या वक्तव्याला तिथेच विरोध करायला हवा होता. माझ्याकडून तिथे चूक झाली."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news