Coldplay kiss-cam Controversy: तो माझ्याशी खोटं बोलला... 'किस' प्रकरणात दिसतं त्यापेक्षा वास्तव वेगळं; HR चे CEO वर गंभीर आरोप

Coldplay kiss-cam Controversy
Coldplay kiss-cam Controversypudhari
Published on
Updated on

Coldplay kiss-cam Controversy: जुलै २०२५ मध्ये कोल्डप्ले कॉन्सर्टदरम्यानकिस कॅमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओत अॅस्ट्रॉनॉमर या कंपनीची माजी एचआर क्रिस्टिन कॅबोट आणि कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांचा किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र त्यानंतर हे दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते हे स्पष्ट झालं अन् त्या एका व्हायरल व्हिडिओमुळं या दोघांचे वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं.

Coldplay kiss-cam Controversy
Cricket Viral Video : आधी भांगडा, मग रन-आऊट! यष्ट्या उडवण्यापूर्वी फिल्डिंग टीमचा मैदानातच रंगला भन्नाट डान्स

दरम्यान, माजी एचआर क्रिस्टिन यांनी सीईओ अँडी बायरन हे त्यांच्याशी त्यांच्या नात्याबाबत खोटं बोलले असल्याचा आरोप केला आहे. विनफ्रे यांच्या ऑन कॅमेरा पॉडकास्टमध्ये बोलताना क्रिस्टिन यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. क्रिस्टिन यांनी सांगितलं की त्यांना असं वाटत होतं की मिस्टर बायरन हे त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या देखील घटस्फोटातून जात होत्या. त्यांना वाटलं की आमची दोघांची वैयक्तिक आयुष्य सारख्याच वळणावर आहे.

Coldplay kiss-cam Controversy
Shubman Gill Sanju Samson Controversy: संजूला केलं गायब.. शुभम गिलच्या टी २० वर्ल्डकपच्या 'त्या' फोटोवरून वाद, काय आहे सत्य?

५३ वर्षांच्या क्रिस्टिन यांना नंतर कळालं की मिस्टर बायरन हे त्यांच्यासोबत खोटं बोलत होते. यानंतर क्रिस्टिन यांनी बायरन यांच्यासोबतचे सर्व संभाषण तोडून टाकलं आहे. त्या म्हणाल्या की, 'या सर्व घडामोडीत प्रमाणिकपणा आणि चारित्र्याबाबत मोठी शंका उपस्थित झाली होती. ते जसे दाखवत होते तसे व्यक्ती नव्हते. खोटं बोलणं मी कदापी सहन करणार नाही. ते माझ्याशी प्रामाणिक राहू शकले असते मात्र त्यांनी तसं केलं नाही.'

Coldplay kiss-cam Controversy
Watch Markram Catch: ...तर दक्षिण आफ्रिका फायनलला गेली असती; मिशेलच्या कॅचमुळे होतोय वाद, थर्ड अंपायरचा निर्णय चुकला?

क्रिस्टिन यांना कोल्डप्लेमधील किसिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपली नोकरी गमवावी लागली होती. त्यांनी त्या आता बायरन यांच्यासोबत बोलणार नाही असं सांगितलं. क्रिस्टिन यांनी सांगितलं की मला जे काही भासवलं गेलं त्यातील अनेक गोष्टी खोट्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news