प्राजक्ता माळी म्हणते- मी जर लग्न केल तर…

prajkta mali
prajkta mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

मराठमोळी सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या लग्न या विषयावरून चर्चेत आलीय. तुम्ही म्हणाल, मनोरंजन विश्वात या गोष्टी घडतचं राहतात. तर येथे केवळ लग्नाचा विषय नाही तर प्राजक्ता माळीने लग्नाविषयी केलेलं वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने एका मुलाखतीत लग्नाविषयीचा खुलासा केला आहे.

प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. तर छोट्या पडद्यावरील मस्त महाराष्ट्राची अँकरही तिचं होती. आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतेय.

तिने एका मुलाखतीत विवाह संस्थांविषयी सांगितलं आहेत. लग्न संस्थांविषयी राग असल्याचे तिनं म्हटले आहे. प्राजक्ता आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मुलाखतीत तिने मराठी चित्रपट 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' विषयी सांगितले. तिला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आली की, प्राजक्ता जर लग्नाचा विचार करेल तर ती कोणत्या मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवेलय़ ती लग्न कसं करेल?

यावर प्राजक्ताचे हास्‌ उमटले. ती म्हणाली, आईने याआधीच एकदा असा उद्योग केला आहे. आणि मला अक्षरश: तोंडावर आपटल्या सारखं झालंय. आईला मी सांगितलं की, जर मी लग्न करेन तर प्रेमात पडून करेन. कारण मन जुळली पाहिजेत; पण आईचं काय सुरु होतं माहिती नाही. काहींना तो मार्ग योग्य वाटत असेल तर त्यांनी तसं लग्न करावं. जर काहींना माझ्यासारखं प्रेमात पडून लग्न करायचं असेल तर त्यांनी तसं करावं.

प्राजक्ता म्हणाली, मला ज्या व्यक्तीविषयी खात्री आहे. मला त्य़ा व्यक्तीविषयी माहिती असेल की ती कशी आहे, त्यावेळी मी विचार करेन. मला ही गोष्ट मटका किंवा मग जुगार म्हणून करू शकणार नाही. कारण ते नातं पुढे घेऊन जाता येईल का ते कळेल आणि नंतर ठरवेन की मला लव्ह मॅरेज करायचंय.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news