Prajakta Mali| प्राजक्ताचा हटके अंदाज; ‘डिंक्स’मधून सांगणार बदलत्या नात्यांची गोष्ट, नवा लूक चर्चेत

प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत! ‘डिंक्स’ चित्रपटाची चर्चा.. बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात!
Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

बदलत्या काळासोबत नात्यांकडे पाहण्याचा नक्कीच दृष्टिकोणही बदलत आहे. लग्न, करिअर आणि बदलत्या नात्यांच्या विश्वात डोकावणाऱ्या नवी कथा घेऊन येत आहे ‘डिंक्स’ चित्रपट. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजय मोंगा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि जितेंद्र राय तसेच नितीन प्रकाश वैद्य यांच्या निर्मितीत साकारला जाणाऱ्या या चित्रपटाची कथा हटके आहे.

Prajakta Mali
Actress Asha Singh Jaiswal Death | महाभारत फेम दिग्गज अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन

आजच्या पिढीच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भावनिक गुंतागुंतीशी जोडलेली ही कथा दिसतेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्राजक्ता माळी एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने समोर आलेल्या प्राजक्ताच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंक ब्लेझर, ब्लॅक शर्ट आणि शॉर्ट हेयर अशा लूकमध्ये प्राजक्ता दिसत आहे.

Prajakta Mali
Mahakali Teaser | 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अंगावर शहारे आणणारा अवतार, 'महाकाली'च्या टीझरमध्ये 'शुक्राचार्यां'ची पहिली झलक

त्यामुळे या लूकमध्ये तिची कोणती भूमिका असणार आह, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘डिंक्स’ अर्थात डबल इनकम नो किड्स ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. आजच्या तरुण जोडप्यांच्या निवडी, नातेसंबंध, अपेक्षा, त्यातून निर्माण होणारे भावनिक प्रश्न चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजय मोंगा म्हणाले, ‘डिंक्स’ हा विषय म्हणजे आजच्या काळाची नात्यांकडे पाहण्याची बदलती दृष्टी आहे. प्राजक्तासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे आणि तिच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी बाजू पाहायला मिळेल.”

निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, “आजच्या पिढीशी थेट संवाद साधणारा आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येईल, असा विषय ‘डिंक्स’ मधून मांडत आहोत.” प्राजक्तासोबत अजून कोण कलाकार पाहायला मिळतील आणि ‘डिंक्स’ या संकल्पनेमागचं भावविश्व चित्रपटातून कसं उलगडणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news