Prajakta Mali-Lalit Prabhakar|जुळणार ललित प्रभाकर-प्राजक्ता माळीची रेशीमगाठ! ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा व्हिडिओ पाहाच

Prajakta Mali-Lalit Prabhakar new movie announced |जुळणार ललित प्रभाकर-प्राजक्ता माळीची रेशीमगाठ! ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा व्हिडिओ पाहाच
Prajakta Mali-Lalit Prabhakar
Prajakta Mali-Lalit Prabhakar new movie announced Pudhari photo
Published on
Updated on

तब्बल १३ वर्षांनंतर मराठी अभिनेता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची पुन्हा केमिस्ट्री जुळणार आहे. या दोघांच्या जोडीने छोट्या पडद्यावर जुळून येती रेशीमगाठी मालिका गाजवली होती. आता ही जोडी नव्या प्रेमकहाणीसह पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटातून ही गोड जोडी भेटीला येतेय. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलीय. प्राजक्ता माळीने चित्रपटाचा टीझर शेअर करत खास कॅप्शनही लिहिलीय.

Prajakta Mali-Lalit Prabhakar
Govinda Sunita Divorce Case : गोविंदाबरोबरील वादावर पडदा..! सुनिता आहुजाकडून घटस्फोटाचा खटला मागे

हंपी, चि. व सौ. का, आनंदी गोपाळ अशा चित्रपटातून आपले वलय निर्माण करणारा अभिनेता ललित आणि टीव्ही मालिका, चित्रपट आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता नवी कोरी प्रेम कहाणी घेऊन येताहेत. इतक्या वर्षांनंतर त्यांची झालेली ही ऑनस्क्रीन भेट निश्चितच खास ठरणार आहे. विशेष म्हणजे ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ची पहिली झलकच खूप दमदार आणि प्रभावी ठरलीय. ही जोडी यावेळी नेमकी कोणती प्रेमकहाणी घेऊन येतेय, याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Prajakta Mali-Lalit Prabhakar
Vijay Deverakonda Best Photo|निवांत क्षण! शूटिंग रद्द होताच आईच्या कुशीत विसावला विजय देवरकोंडा

ज्युबिलंट फिल्म्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतीक पाटील करत आहेत. ललित प्रभाकर, प्रतीक पाटील आणि इरावती कर्णिक यांनी पटकथा लिहिली असून, संवाद इरावती कर्णिक यांचे आहेत. नितीन प्रकाश वैद्य आणि अश्विनी ब्रह्मनाथकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

ललित आणि प्राजक्ता यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीपासूनच आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र आणताना त्या जुन्या ओळखीपलीकडे जाऊन त्यांना एका नव्या विश्वात सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मधील त्यांचा प्रवास प्रेम, गंमतीजंमती आणि काही अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे. ही कथा आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल.’

-प्रतीक पाटील, दिग्दर्शक

ललित आणि प्राजक्ता यांना पुन्हा एकत्र आणण्याचा विचारच खूप उत्साह देणारा होता. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते आणि त्यांना पुन्हा एकत्र पाहाण्याची इच्छा होती. मात्र या चित्रपटात केवळ त्या लोकप्रिय जोडीची पुनरावृत्ती नाही, तर त्यांच्यासाठी एक नवी कथा आणि नवं विश्व आहे.

नितीन वैद्य, निर्माते

निर्मात्या अश्विनी ब्रह्मनाथकर म्हणतात, ‘’या चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. ललित- प्राजक्ताची पडद्यावरील केमिस्ट्री आणि सहजता या कथेच्या भावविश्वाला अगदी योग्य आहे. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता प्रेक्षकांमध्येही या भेटीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news