

पुढारी ऑनलाईन डेस्क : खूप मेहनत घेऊन वजन कमी केल्यानंतर प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिचा लूक आणखी सुंदर दिसत आहे. आपल्या अभिनयाने आणि अदांनी प्राजक्ताने नेहमीच सर्वांना मोहून टाकलं आहे. आता तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना आणखी भूरळ घातलेली दिसून येते. आता तिने नवा फोटोशूट केला आहे. या फोटोशूटमुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. कारण, या नव्या फोटोजमध्ये तिने केलेल्या लूकमुळे ती खूप सुंदर दिसतेय. (Prajakta Mali)
रानबाजार या वेबसीरीजमुळे प्राजक्ताची खूप चर्चा झाली होती. त्यात तिच्या वाढलेल्या वजनामुळे प्राजक्ता ट्रोलदेखील झाली होती. पण, त्यानंतर ती अचनक बदललेल्या लूकमध्ये दिसली. तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. आता तिने काळ्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिच्या फोटोंची आता चर्चा होताना दिसतेय. काळ्या साडीवर तिने स्ट्रॅपलेस ब्लॉउज परिधान केलं आहे. त्यासोबत दंडात आणि गळ्यात सुंदर दागिनेही घातले आहेत.
नाकातील नथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. ती याआधी 'पावनखिंडमध्ये दिसली होती. 'रानबाझार' यामधून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती आता 'वाय' या चित्रपटातही दिसेल.
https://www.instagram.com/p/CfdfsgzLN-y/