Lalit Prabhakar Prahaar look | अजमल कसाबच्या भूमिकेत ललितचा दमदार फर्स्ट लूक, 'प्रहार'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

26/11 हल्ल्यावर आधारित 'प्रहार'ची चर्चा; ललित प्रभाकर साकारणार अजमल कसाबची भूमिका;
Lalit Prabhakar
Lalit Prabhakar Prahaar look viral
Published on
Updated on
Summary

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आधारित 'प्रहार' या चित्रपटातील ललित प्रभाकर यांचा अजमल कसाबच्या भूमिकेतील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा असून, प्रेक्षकांना ललित प्रभाकर ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारतील याची उत्सुकता लागली आहे.

26/11 च्या हल्ल्याचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दहशतवादी अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरचा दमदार फर्स्ट लूक समोर आला आहे.

'प्रहार' या चित्रपटाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. त्या भीषण घटनेची आठवण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जिवंत होणार असून, 'प्रहार' या आगामी चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील अभिनेता ललित प्रभाकरचा दहशतवादी अजमल कसाबच्या भूमिकेतील फर्स्ट लूक समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

'प्रहार'च्या पोस्टरमध्ये ललित प्रभाकर यांचा लूक पूर्णपणे वेगळा आणि धक्कादायक दिसत आहे. या भूमिकेसाठी त्यांनी केलेला मेकओव्हर आणि चेहऱ्यावरील भाव पाहून अनेकांनी त्यांच्या अभिनयाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा ललित प्रभाकर आता पहिल्यांदाच एका दहशतवाद्याची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

Lalit Prabhakar
Hema Malini |हेमा मालिनींच्या ५४ वर्षे जुन्या बंगल्याची झलक; धर्मेंद्र यांच्या आठवणींनी सजलेलं आलिशान घर पाहिलंत का?

26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण घटनांपैकी एक मानला जातो. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक, पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलातील जवानांनी प्राण गमावले होते.

'प्रहार'चा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी ललित प्रभाकर यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे, तर काहींनी चित्रपटाची कथा आणि मांडणी कशी असेल याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पोस्टरमधील लूक पाहून हा चित्रपट वास्तववादी शैलीत सादर केला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चि. व सौ का, आनंदी गोपाळ, सुपर डुपर यासारख्या चित्रपटांमध्ये ललित प्रभाकरने रोमँटिक, कौटुंबिक आणि गंभीर अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, अजमल कसाबसारखी व्यक्तिरेखा साकारणे हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काम मानले जात आहे. या भूमिकेसाठी त्यांनी केलेली तयारी आणि अभिनय प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरा उतरतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होईल.

Lalit Prabhakar
Baahubali 3 Confirm? : प्रभासने तीन बोटे दाखवली अन्‌ अनुष्काचं हसू; 'बाहुबली ३' बाबत डॉक्युमेंटरीमध्ये उघड झाली माहिती

सध्या 'प्रहार'च्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अधिक माहिती जाहीर केलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले आहे. कथानक: हा चित्रपट ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आणि अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी चालवलेल्या कायदेशीर लढाईवर आधारित आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news