Hema Malini |हेमा मालिनींच्या ५४ वर्षे जुन्या बंगल्याची झलक; धर्मेंद्र यांच्या आठवणींनी सजलेलं आलिशान घर पाहिलंत का?

हेमा मालिनीच्या ५४ वर्षांपूर्वीच्या बंगल्यात धर्मेंद्र यांच्या आठवणी, लक्झरी इंटीरियरने प्रत्येक कानाकोपरा सजला
Dharmendra-Hema malini
Dharmendra-Hema malini Instagram
Published on
Summary

मुंबईतील हेमा मालिनी यांचा ५४ वर्षे जुना 'अद्वितीय' बंगला त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींचा साक्षीदार आहे. ईशा देओलने या घराची खास सफर घडवत धर्मेंद्र यांच्या आठवणी, नृत्यासाठी स्वतंत्र स्टुडिओ, दोन स्वयंपाकघरं, कौटुंबिक छायाचित्रे आणि घरामागील भावनिक कथा चाहत्यांसमोर उलगडली.

हेमा मालिनी यांचा मुंबईतील ५४ वर्षांपूर्वीचा आलिशान बंगला आजही त्यांच्या आयुष्यातील असंख्य आठवणी जपून ठेवतो. अभिनेत्रीने या घराचा प्रत्येक कोपरा पती धर्मेंद्र यांच्या स्मृतींनी सजवला आहे. मुलगी ईशा देओलने नुकतीच आईच्या या स्वप्नवत घराची खास झलक दाखवली.

हे घर हेमा मालिनी यांच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. कारण याच घरातून त्यांनी मायानगरीत आपल्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या नृत्यप्रवासापासून सुपरस्टार होण्यापर्यंतचा आणि धर्मेंद्र यांच्यासोबतच्या प्रेमकथेचा प्रत्येक क्षण या घराने अनुभवला आहे.

ईशा या बंगल्यात आई, मावशी आणि इतर कुटुंबीयांसोबत राहते. संस्कृती, कला आणि धर्मेंद्र यांच्या आठवणींनी सजलेल्या या घराची तिने एका यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सफर घडवली. घराच्या भिंतींवर शास्त्रीय नृत्याच्या विविध मुद्रा दर्शवणारी चित्रे आहेत. तसेच ईशा, आहाना आणि हेमा यांच्या नृत्य सादरीकरणांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. नृत्यविषयक पुस्तकांचा संग्रह आणि नटराजाची मूर्तीही या घराचे आकर्षण ठरते.

नृत्य सरावासाठी घरात स्वतंत्र प्रशस्त स्टुडिओ आहे. याच ठिकाणी ध्यानधारणाही केली जाते. या हॉलमध्ये एकावेळी सुमारे ३० जण सहजपणे नृत्याचा सराव करू शकतात.

या सराव कक्षात धर्मेंद्र यांचा मोठा फोटो आहे, ज्यामध्ये हेमा आनंदाने हसताना दिसतात. वडिलांविषयी बोलताना ईशा अनेकदा भावुक झाल्याचेही दिसून येते.

घरात एक स्वतंत्र कार्यालयीन खोली असून ती हेमा, धर्मेंद्र आणि त्यांच्या मुलांसोबतच्या कौटुंबिक छायाचित्रांनी सजलेली आहे. याच खोलीत धाग्यांनी तयार केलेले धर्मेंद्र आणि हेमा यांचे खास कलात्मक चित्रही ठेवण्यात आले आहे.

या बंगल्यात दोन वेगवेगळी स्वयंपाकघरं आहेत. हेमा मालिनी शाकाहारी असल्यामुळे त्यांचे स्वयंपाकघर स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. तसेच चाहत्यांनी भेट दिलेल्या कुशनवर हेमा आणि धर्मेंद्र यांची छायाचित्रे छापलेली आहेत.

ईशाच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षे या बंगल्याला कोणतेही नाव नव्हते. नंतर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी या घराला 'अद्वितीय' हे नाव दिले.

तीन मजली असलेल्या या बंगल्यात प्रत्येक मजल्याची सजावट वेगळी आहे. ईशा आणि आहाना यांच्या मजल्यांचे इंटिरिअरही एकमेकांपेक्षा भिन्न आहे. ईशाने यावेळी आपल्याला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ विशेष आवडत असल्याचेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news