Sunny Leone Petta Rap | प्रभू देवा-सनी लिओनीचा 'पेट्टा रॅप' यादिवशी

प्रभूदेवा-सनी लिओनी यांचा 'पेट्टा रॅप' या दिवशी रिलीज
Sunny Leone Petta Rap
प्रभू देवा-सनी घेऊन येत आहेत पेट्टा रॅप Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सनी लिओनी तिच्या पुढच्या तमिळ चित्रपट 'पेट्टा रॅप' साठी सज्ज झाली आहे. यामध्ये ती प्रसिद्ध कोरिओग्राफर चित्रपट निर्माता आणि अभिनेता प्रभु देवासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ज्यात प्रभू देवा आणि वेदिका यांच्यासोबत सनी आहे. परफेक्ट मास एंटरटेनर होण्याचे आश्वासन देणारा हा चित्रपट २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पोस्टरमध्ये सनी ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. याआधी ही अभिनेत्री प्रभू देवासोबत एका गाण्यात डान्स करणार असल्याचे समोर आले होते. यापूर्वी सनीने तामिळ चित्रपट 'कोटेशन गँग' मधील तिच्या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होतेज्यामध्ये ती एका मारेकरीची भूमिका साकारत आहे.

'पेट्टा रॅप' आणि 'कोटेशन गँग' व्यतिरिक्त सनी प्रभुदेवा आणि हिमेश रेशमियाच्या 'बॅडस रविकुमार'मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे 'शेरो' आणि अनटायटल्ड मल्याळम चित्रपट देखील आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news