उगाच नाही Kalki 2898 AD वर ६०० कोटी खर्च केले, ट्रेलर पाहाच!

अमिताभ बच्चन यांचा कल्कि चित्रपटामधील लूक
अमिताभ बच्चन यांचा कल्कि चित्रपटामधील लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण सध्या Kalki 2898 AD चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची घोषणा झाल्यापासून खास बाब ही आहे की, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाविषयी अपडेट दिली आहे, ज्यामुळे आतादेखील एक्स अकाऊंटवर कल्कि ट्रेंड करत आहे.

अधिक वाचा –

दीपिक पदुकोणने आपल्या लूकचा पोस्टर शेअर करत सांगितले होते की, ट्रेलर १० जून रोजी रिलीज होईल. या पोस्टरमध्ये दीपिका इंटेंस लूकमध्ये दिसत आहे. दीपिकाचा असा लूक पाहून तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह देखील स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने कॉमेंट केलं.

कधी रिलीज होईल चित्रपट?

कल्कि 2898 एडी एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नाग अश्विनने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटामध्ये प्रभास, दीपिका, अमिताभ बच्चन सोबत कमल हासन देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. कमल हासन विलेनच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २७ जूनला रिलीज होईल. रिपोर्ट्सनुसार, मानवजातीच्या भविष्याविषयी सांगण्यात आलं आहे. हे एक मायथॉलॉजीने प्रेरित कहाणी आहे.

अधिक वाचा –

बजेट ऐकून धक्का बसेल

प्रभासच्या या चित्रपटाचे बिग बजेट असून निर्मात्यांनी यावर ६०० कोटी रुपये खर्च केले आहे. निर्मात्यांनी कल्कि 2898 एडीवर इतके कोटी खर्च केल्याचे पाहून फॅन्सना चित्रपटात नेमकं काय असले, याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news