अमृता राव ‘जॉली एलएलबी 3’ साठी सज्ज; अक्षय- अर्शद वारसी कोणासोबत होणार रोमाँटिक?

Amrita Rao
Amrita Rao
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी ३' हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. नुकतेच या धमाकेदार चित्रपटाचे शुटिंगला सुरूवात झाली आहे. चित्रपटात डबल तडका पाहायला मिळणार आहे. म्हणजेच, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही या सिनेमात दिसणार आहेत. 'जॉली एलएलबी' पहिल्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी दिसला होता. तर दुसऱ्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारने हुमा कुरेशीसोबत स्क्रिन शेअर केली होती. तर अभिनेता सौरभ शुक्लाने दोन्ही चित्रपटात जजची भूमिका साकारली होती. आता 'जॉली एलएलबी ३' यात बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव एन्ट्री करणार आहे. त्यामुळे अमृता अर्शद वारसी किंवा अक्षय कुमारसोबत अभिनय साकारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'जॉली एलएलबी ३' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव अभिनेता अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात मागच्या सीझनच पुढील टप्पा दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. अमृताचा त्या शेड्यूलमध्ये समावेश होता. मात्र, अमृताने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राजस्थाननंतर मुंबई आणि दिल्लीत शूटिंग

चित्रपटाच्या सुटिंगबाबत एका सूत्राने सांगितले आहे की, 'जॉली एलएलबी ३' शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. आता पुढील शूटिंग मुंबईत पार पडणार आहे. यानंतर चित्रपटातील काही सीन दिल्लीतही शूट होणार आहेत.

'जॉली एलएलबी ३' विरोधात तक्रार दाखल

महिनाभरापूर्वी हा चित्रपट वादात सापडला होता. 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाविरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत, चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठेला कलंक लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे त्याचे शूटिंग थांबवावे. याशिवाय वकील आणि न्यायाधीशांचीही खिल्ली उडवली जात आहे. असेही नमूद केलं होतं. या आता चित्रपटाचे शुटिंगला सुरूवात झाली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news