

लोकशाहीत ‘Power’ हा शब्द कोणासाठी वापरला जातोय. पॉवरमध्ये नेमकं कोण आहे? अभिनेत्रीने तिची एक पोस्टमधून केलीय. देशात किंवा राज्यात एखादी व्यक्ती किंवा पक्ष सत्तेत आहे, असं म्हणणं चुकीचं असून खरी सत्ता ही फक्त जनतेकडेच असते, असे तिचे म्हणणे आहे.
Sharmila Shinde viral post on instagram about 'power'
नवरी मिळे हिटलरला सारख्या अनेक मराठी टीव्ही मालिकांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आलीय. तिने तिच्य़ा इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये देशातल्या वा व्यक्तीच्य़ा पॉवर (Power) वरून तिने आपले परखड मत मांडले आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाली शर्मिला?
आजच्या राजकीय आणि सामाजिक चर्चांमध्ये ‘Power’ हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जातंय शर्मिलाच्या मते, अमुक अमुक पक्ष किंवा व्यक्ती सत्तेत आहे किंवा त्याच्याकेड पॉवर आहे, असे म्हटले जाते, मात्र लोकशाही व्यवस्थेत खरी सत्ता कोणाकडे असते, याचा विचार फारच कमी लोक करतात.
मला माझ्या देशात सगळ्यात जास्त चुकीचा वाटणारा शब्द आहे Power. अमुक अमुक पक्ष किंवा व्यक्ती देशात/राज्यात power मधे आहे" कशी काय? कुठल्याही लोकशाहीमधे जर कुणी power मधे असतं तर ती फक्त आणि फक्त जनता असते. बाकी सगळे आपण दिलेल्या पगारावरती काम करणारे जनतेचे सेवक आहेत. माझ्या घरी स्लाइडिंग विंडोच काम करायला आलेल्या व्यक्तीला मी सांगते की मला विंडो कशी हवी आहे. तो नाही ठरवत की विंडो कशी असेल किंवा तो पैसे घेऊन विंडो बनवणारच नाही आहे.
- शर्मिला राजाराम शिंदे, अभिनेत्री
शर्मिला आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हणते-
शर्मिला म्हणाली की, कोणत्याही लोकशाही देशात जर कोणी सत्तेत असेल, तर ती सत्ता फक्त आणि फक्त जनतेकडे असते. उर्वरित सर्व राजकारणी, प्रशासकीय अधिकारी किंवा व्यवस्था या जनतेने दिलेल्या पगारावर काम करणारे सेवक असतात. मात्र ‘Power’ या शब्दाचा चुकीचा वापरतो. काही व्यक्ती किंवा पक्ष, देश किंवा राज्य पॉवरमध्ये कसे काय असतो? असा प्रश्न तिने याठिकाणी उपस्थित केला आहे.
ती आपल्या पोस्टमध्ये स्लायडिंग विंडोचं उदाहरण देते. ती म्हणते की, “माझ्या घरी स्लायडिंग विंडोचं काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही मी हेच सांगते. मला विंडो कशी हवी आहे, हे मी ठरवणार आहे. कारण मी ग्राहक आहे. तसेच लोकशाहीत जनता ही ग्राहक आहे आणि राजकारणी हे सेवा देणारे आहेत.”
यावरून लोकशाहीतील खरी पॉवर ही लोकांकडेच असते. जनता ठरवणार की, त्यांना काय हवंय, असे तिने पोस्टमध्ये अखेरीस नमूद केले आहे. लोकशाहीची खरी ओळख जनताच असल्याचं तिने स्पष्ट केलं.