

Yash च्या ‘Toxic’ सिनेमाचा टीजर रिलीज होताच एका आक्षेपार्ह सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री Beatriz Taufenbach हिने आपलं सोशल मीडिया अकाउंट डिॲक्टिवेट केल्याचं समोर आलं असून, हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
यशच्या वाढदिवसाला टॉक्सिकचा टीजर आळा. पण स्मशानभूमीत चित्रीत करण्यात आलेल्या यश आणि Beatriz Taufenbach यांचा एक सीन सध्या वादग्रस्त ठरला आहे. सीन रिलीज होताच Beatriz Taufenbach ला ऑनलाईन नैतिकता आणि ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटातील या सीनमुळे आक्षेपार्ह टीका होत आहेत. हे प्रकरण सीबीएफसीपर्यंत पोहोचले. टॉक्सिकचे टीजर नैतिकपणे आक्षेपार्ह असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
रॉकिंग स्टार यशच्या वाढदिवसानिमित्त ८ जानेवारी २०२६ रोजी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. टीझरमधील स्मशानभूमीत यश आणि बीट्रिझ टॉफेनबॅक यांच्यावर चित्रित झालेला एक छोटा सीन वादग्रस्त ठरला. त्याआधी स्मशानभूमीत दाखवण्यात आलेल्या एका छोट्या मुलीच्या सीनवरून नैतिक विषय चर्चेत आला. त्यानंतर अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आलेल्या सीनवरून चर्चा सुरु झाली. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी अलीकडेच टॉफेनबॅकची ओळख सांगितली होती. तयानंतर मात्र तिला ऑनलाईन ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अनेक युजर्सनी हा सीन आक्षेपार्ह असल्याचा आरोप केला असून, त्यावरून जोरदार टीका केली जात आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘Toxic’ चित्रपटाशी संबंधित अभिनेत्री Beatriz Taufenbach हिने आपलं सोशल मीडिया अकाउंट डिॲक्टिवेट केल्याचं समोर आलं आहे. तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट ठेवलं आहे. काही जणांच्या मते, टीजरनंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे आणि नकारात्मक प्रतिक्रियांमुळे तिने हा निर्णय घेतला असावा.
अभिनेत्री डिॲक्टिव्हेट केले अकाऊंट
वाढते ट्रोलिंग पाहता अभिनेत्री Beatriz Taufenbach ला आपले सोशल मीडिया अकाऊंट तात्पुरते डिॲक्टेव्हेट करावे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय कॉमेट्सपासून वाचण्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
‘Toxic’ हा Yash च्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जात आहे. टीजरमध्ये Yash चा डार्क, रॉ आणि इंटेन्स अवतार पाहायला मिळतो. मात्र याच टीजरमधील एका सीनवरून नटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. काहींना तो सीन चित्रपटाच्या स्टोरीसाठी योग्य असल्याचे वाटतो, तर काहींनी तो अनावश्यक असल्याचं म्हटलं आहे.