Marathi movie Phulwara Teaser Ravi Jadhav| घुंगरु नेमके कुणाच्या पायात? ‘फुलवरा’ चित्रपटाचा अस्सल बावनकशी टीझर पाहाच

Phulwara teaser Ravi Jadhav Marathi movie- लावणीच्या ध्यासाची गोष्ट सांगणारा फुलवरा
Phulwara Teaser Ravi Jadhav
Phulwara Teaser Ravi Jadhav
Published on: 
Updated on: 

कलाकाराचा खरा प्रवास म्हणजे केवळ रंगमंचावरचा झगमगाट नाही तर त्यामागील संघर्ष, जिद्द, मेहनत असते. काही वर्षांपूर्वी ‘नटरंग’ सिनेमाने मराठीत लावणीच्या विश्वाला नवी झळाळी दिली होती. आता तसंच काहीतरी काळजाचा ठाव घेणारं रूप घेऊन दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आलाय.

Phulwara Teaser Ravi Jadhav
Shah Rukh Khan King Movie: थिएटरमध्ये येण्याआधीच ‘किंग’चा जलवा! ४०० कोटींच्या चित्रपटाने कमावले ८०० कोटी, कमाईचं गणित काय?

या टीझरची खासियत म्हणजे यात कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवलेला नाही. त्याऐवजी लक्ष वेधून घेतात ते कलाकारांचे पाय, कधी जल्लोषात तर कधी अडखळत चाललेले आणि रक्ताने माखलेले घुंगरू! देवीला फुलवरा वाहणारे हात, ढोलकीची ठसकेदार थाप, तब्ल्याचा ताल आणि त्यावर बेभान होऊन थिरकणारे पाय, अशी दृश्ये टीझरमध्ये दिसतात. "घुंगरु पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!" हे या चित्रपटाचं सूत्र आहे.

दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, लावणीच्या ठेक्यामागे आणि अदाकारीमागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतले घुंगरू आणि त्यांना लागलेले रक्त-माती हे त्याच प्रवासाचं प्रतीक आहे. हीच लोककलेमागची ओढ आणि निष्ठा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

Phulwara Teaser Ravi Jadhav
Shah Rukh Khan King Movie: चित्रपट रिलीज व्हायचाय, पण शाहरुखच्या ‘किंग’ने आधीच रचला इतिहास! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

‘द फोक आख्यान’च्या माध्यमातून लोककलेत वेगळा ठसा उमटवणारे ईश्वर ताराबाई अंधारे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत, तर हर्ष-विजयने संगीत दिले आहे. चित्रपटात कलाकार कोण असतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा ‘फुलवरा’ मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.