अभिनेता शाहीर शेख साकारणार ‘पवित्र रिश्ता’मधील मानव

अभिनेता शाहीर शेख साकारणार ‘पवित्र रिश्ता’मधील मानव
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पवित्र रिश्ता मालिका लवकरच प्रेक्षकांच्‍या भेटीला येत आहे.  पवित्र रिश्ता मालिकेमधील मानवची भूमिका अभिनेता शाहीर शेख साकारणार आहे. यापूर्वी ही भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने साकारली हाेती.

अधिक वाचा 

पवित्र रिश्ता २ मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ऐवजी  दिसणार आहे.अभिनेता शाहीर शेख आणि अंकिता लोखंडे यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिका 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या दुसर्‍या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे.

यापूर्वी मालिकेत सुशांतने 'मानव'ची तर अंकिताने 'अर्चना'ची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवरील शाहीर आणि अंकिताचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अधिक वाचा 

'पवित्र रिश्ता २' च्या शूटिंगची पहिला फोटो एएलटीबालाजीच्या हँडलवर व्हायरल करण्यात आला.

या फोटोमध्ये शाहीर शेख आणि अंकिता लोखंडे यांच्या हातात 'पवित्र रिश्ता' असा मजकूर लिहिलेली पाटी दिसत आहे.

अभिनेत्री उषा नाडकर्णी याही फोटोत शाहीरसोबत दिसत आहेत.या फोटोंसोबत 'कधीकधी आपल्याला अगदी सामान्य जीवनात विलक्षण प्रेमकथा पाहायला मिळते.

मानव आणि अर्चनाच्या या विलक्षण प्रेमकथेचे साक्षीदार व्हा. 'पवित्र रिश्ता २' चे शूटिंग सुरू झाले आहे. लवकरच एएलटीबालाजीवर प्रसारित होईल.' अशी कॅप्शन लिहिली आहे.

अधिक वाचा 

हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी कॉमेंन्टस केल्या आहेत. 'पवित्र रिश्ता' ही मालिका खूपच गाजली होती. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण होत आहे.

'पवित्र रिश्ता २' या मालिकेत मराठमोळ्या अभिनेत्री अभिज्ञा भावेचा समावेश झाला आहे. याशिवाय या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत आशा नेगी, ऋत्विक धनजानी, हितेन तेजवानी आणि सविता दामोदर देशमुख यांनी ही भूमिका साकारल्या आहेत.'पवित्र रिश्ता २' या मालिकेची चाहत्यांना खुपच उत्सूकता शिगेला लागली आहे.

हेही वाचलं का?

पाहा :चला करूया विस्टाडोम कोचची निसर्गरम्य सफर 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news