Paru TV Serial | पारूच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांची गुंफण उलगडणार!

पारूच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांची गुंफण उलगडणार!
Paru TV Serial
Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - आदित्य, पारू आणि अनुष्का यांच्या आयुष्यात येणाऱ्या अप्रत्यक्षित वळणांसाठी तयार राहा, कारण पारूच्या आगामी भागांमध्ये खूप काही घडामोडी घडताना दिसणार आहेत. पारूच्या वागणुकीतील अचानक बदलाने गोंधळलेला आदित्य हा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मारुतीचा विरोध त्याला सहन करावा लागतो. मात्र अनुष्का पुन्हा एकदा मदतीला धावून येते आणि पारूला शूटसाठी परवानगी मिळवून देते. यानंतर आदित्य, पारूला अनुष्का आणि त्याच्या नात्याविषयीच्या अस्वस्थतेबद्दल विचारतो. पारू काहीही नाही असे सांगत आपल्या भावना दडपण्याचा निर्धार करते.

पारू आदित्यपासून दूर जाते आणि त्याला "मालक साहेब" म्हणून हाक मारते. जाहिरातीच्या शूट दरम्यान, गाडीचा टायर पंक्चर झाल्याने पारू एकटी आहे. नानू नावाच्या केअरटेकरकडून तिला मदत मिळते, पण यामुळे आदित्य जेलस होतो. दरम्यान, गुरुजींच्या भविष्यवाणीमुळे नाट्य आणखी वाढते, ज्यामुळे अहिल्या, पारू आदित्यच्या भाग्याशी संबंधित आहे का यावर शंका घेऊ लागते. नाट्य त्याच्या शिखरावर पोहोचत जेव्हा अनुष्का निराश होऊन पारूशी नशेत वाद घालते.

पारूचे उत्तर हा संघर्ष आणखी वाढवेल का, की काही नवे खुलासे उघड होतील? भावनांचा हा नाट्यमय प्रवास पाहण्यासाठी 'पारू' रोज संध्याकाळी ७:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

Paru TV Serial
हायवेवरून अभिनेता मुश्ताक खान यांचे कसे झाले अपहरण? १२ तास केलं टॉर्चर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news