

Partho Ghosh Passes Away
मुंबई - हिंदी चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन झाले आहे. मुंबईतील निवासस्थानी हार्ट ॲटॅक आल्याने त्यांचे निधन झाले आहे. ऋतुपर्णा सेनगुप्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते ७४ वर्षांचे होते.
ऋतुपर्णा सेनगुप्ताने भावूक श्रद्धांजली वाहिली आहे. ऋतुपर्णा सेनगुप्ताने सोशल मीडियावर माहिती देत लिहिलं की, “खूप दु:खी आहे. आम्ही एक उत्तम निर्माता आणि एक निर्मळ मनाच्या माणसाला गमावलं. पार्थो दा, आपण जी सिनेमाई जादू दाखवली, ती नेहमी लक्षात राहिल.”
पार्थो यांनी १९८५ मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. १९९१ मध्ये थ्रिलर चित्रपट ‘100 डेज’ पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. पुढे दिव्या भारती सोबत १९९२ मध्ये ‘गीत’ चित्रपट आणला होता. १९९३ मध्ये ‘दलाल’ हिट झाल्यानंतर एक यशस्वी दिग्दर्शक झाले. १९९६ मध्ये रिलीज झालेला ‘अग्नि साक्षी’ सर्वात हिट ठरला. ज्यादा पॉपुलर
पार्थो घोष यांनी १५ हून अधिक चित्रपट आणले. त्यामध्ये ‘तीसरा कौन?’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘युगपुरुष’, ‘एक सेकंड… जो जिंदगी बदल दे?’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. २०१८ मध्ये ‘मौसम इकरार के दो पल प्यार के’मधून त्यांनी वापसी केली होती.