सायली संजीव-पार्थ भालेरावच्या “पिल्लू बॅचलर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पिल्लू बॅचलर चित्रपट
पिल्लू बॅचलर चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून "पिल्लू बॅचलर" हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित बातम्या –

चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केले आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन आहे. सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका चित्रपटात असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news