

राईज अँड फॉल हा रिअलिटी शो एक वेगळी संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. वेगवेगळ्या चॅलेंजनी या शो मधील उत्सुकता कायम ठेवली. यावेळी मात्र शोमध्ये हाय व्हॉल्टएज ड्रामा दिसून आला. याला कारण होते डबल एलिमिनेशन. फिनालेच्या आधी झालेल्या डबल एलिमिनेशनने शोमधील तो तगड्या स्पर्धकांना बाहेर जावे लागले आहे. (Latest Entertainment News)
नुकतेच किकू शारदा आणि आदित्य नारायण यांना शोमधून बाहेर पडावे लागले. हा शो सध्या त्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. आता केवळ सहा स्पर्धकच फिनालेसाठी थांबले आहेत.
या आठवड्यात किकू शारदा, आदित्य नारायण, आकृति नेगी आणि नयनदीप रक्षित हे नॉमिनेशनमध्ये होते. अशा या तणावपूर्ण वातावरणातच दोन एलिमिनेशन झाल्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्या राऊंडमध्ये रूलर्सनी व्होट देऊन किकू शारदाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर लगेच बेसमेंटमधील लोकांनी बाली, आरुष भोला आणि मनीषा राणीने आदित्य नारायणचे नाव एलिमिनेशनसाठी निवडले. आदित्य बाहेर जाताच घरातील वातावरण भावुक झाले.
आदित्यच्या एलिमिनेशनची घोषणा होता त्याचे मित्र अरबाज आणि धनश्री स्वत:ला आवरु शकले नाहीत आणि रडू लागले. शोच्या पहिल्या दिवसापासूनच या तिघांचा चांगला बॉन्ड तयार झाला होता. अरबाज या शोच्या फिनालेमध्ये पोहोचला आहे. यावेळी अशनीरने अरबाज आणि धनश्रीच्या बॉंडिंगचे कौतुकही केले आहे.
आरुष भोला बाली, मनीषा राणी, आकृति नेगी, नयनदीप रक्षित हे कामगाराच्या भूमिकेत राहतील. तर अर्जुन बिजलानी, अरबाज पटेल आणि धनश्री वर्मा हे शासकाच्या भूमिकेत राहतील.