

series Panchayat Season 4 Cast Fees
मुंबई - ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची सर्वात चर्चित वेब सीरीज पंचायत-४ चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. फुलेरा गावातील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. यामध्ये नीना गुप्ता ते जितेंद्र कुमार आणि रघुवीर यादव ते फैसल मालिक यांच्या अभिनयाला लोक दाद देत आहेत. पंचायतच्या ४ थ्या सीजनसाठी कोणत्या कलाकाराने किती फी घतली, जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, पंचायत सीरीजचे सचिव जी उर्फ जितेंद्र कुमारने पंचायत सीजन ४ च्या एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये फी वसूल केली आहे. सीरीजमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत आहेत. सीरीजसाठी सर्वाधिक फी त्यांनी घेतलीय.
रिपोर्टनुसार, दुर्गेश कुमारने भूषण उर्फ बनराकसची भूमिका साकारलीय. भूषणने सीरीजच्या एका एपिसोडसाठी ५ से ७ हजार रुपये वसूल केले आहेत. त्यांची एकूण सीजनची फी ५ लाख साठ हजारच्या जवळपास आहे.
जितेंद्र कुमार नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री नीना गुप्ता. संपूर्ण सीजनसाठी ४ लाख रुपये घेतले आहे. त्यांची प्रत्येक एपिसोडची फी ५० हजार होती.
तिसऱ्या क्रमांकावर फुलेराचे प्रधान उर्फ रघुबीर यादव आहेत. त्यांनी सीरीजसाठी प्रत्येक एपिसोडला ४० हजार फी घेतली. एकूण सीझनची फी ३ लाख २० हजार आहे.
प्रहलादने एका एपिसोडसाठी २० हजार रुपये घेतले आहेत. संपूर्ण ८ एपिसोडची फी १ लाख ६० हजार आहे. उप-प्रधान साकारणारे फैसल मलिकनी १०-१२ हजार रुपये प्रति एपिसोड घेतले आहेत.
सचिव जीचे सहाय्यक विकासच्या भूमिकेतील चंदन रॉयने देखील फैसल इतकीच फी घेतलीय