

Rajkummar Feels Nervous Play Former Indian Cricketer Sourav Ganguly Role
मुंबई - बॉलीवूडचा हरहुन्नरी कलाकार राजकुमार राव आता पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यावेळी राजकुमार राव दादा अर्थातच सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. बायोपिक येणार न येणार, यावरून चर्चा सुरु असताना आता स्त्री फेम अभिनेता राजकुमारचे नाव कन्फर्म झाले आहे. बायोपिकमध्ये सौरव गांगुलीच्या वैयक्तिक जीवन ते करिअर दाखलण्यात येईल.
एका वेबसाईटशी बातचीतमध्ये अभिनेता राजकुमार रावने कन्फर्म केलं की, तो माजी कॅप्टन गांगुलीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करणार आहे. राजकुमार म्हणाला, ‘जेव्हा दादाने हे म्हटलं आहे तर मला देखील ते अधिकृतपणे घोषित करायला हवं. हो, मी त्यांची बायोपिक करत आहे आणि दादाची भूमिका साकारत आहे. मला दादाच्या या भूमिकेसाठी खूप भीती वाटतेय. ही खूप मोठी जबाबदारी आहे, पण हे कूपच मजेशीर होणार आहे.’
राजकुमार चित्रपटासाठी बंगाली शिकत आहे. यावेळी येणाऱ्या अडचणींचाही त्याने उल्लेख केला. पण, त्याच्यासाठी हे इतकं कठीण नाही, कारण त्याची पत्नी पत्रलेखा देखील बंगाली आहे. पण या भूमिकेसाटी स्वत:ला तयार करमे कठीण असल्याचे त्याने सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीला खुद्द सौरव गांगुलीने आपल्या बायोपिक बद्दल सांगितले होते. यामध्ये राजकुमार राव त्याची भूमिका साकारणार असल्याचे त्याने म्हटले होते. पण नंतर तारखेंच्या अडचणींमुळे समस्या येत होत्या.
राजकुमार राव ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘मालिक’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. अभिनेत्री मानुषी छिल्लरची प्रमुख भूमिका असणार आहे.