

Jitendra Kumar-Sanvika Panchayat-4 sachiv ji rinki love story
मुंबई - जीतेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता रजवार, अशोक पाठक, पंकज झा यांच्या भूमिका असलेला 'पंचायत ४' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अक्षत विजयवर्गीय, दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित सीरीज आज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर भेटीला आली आहे. या सीरीजमध्ये फुलेरातील सचिवजी एमबीए पास झाले आहेत. फुलेराच्या निवडणुकीसोबतच सचिव जी - रिंकी यांच्या लव्ह स्टोरीवर फोकस करण्यात आलं आहे. आता पाचव्या सीझनमध्ये त्यांची लव्ह स्टोरी चांगल्या पद्धतीने दाखवली जाऊ शकते.
पंचायत ४ मध्ये फुलेरामध्ये गावचे राजकारण आणि भावनांना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव आहेत. कथानकात पंचायत निवडणूक आणि सत्ता संघर्ष आहे. दुसरीकडे, सचिव जींच्या आयुष्यात येणारे चढ-उतार आहेत. ज्यामध्ये सचिव जी एमबीएच्या यशाचा जल्लोष केलाय, पण प्रधान जींच्या निवडणूक पराभवावर दु:खही व्यक्त केलं जातंय. इकडे रिंकीला सचिवजींनी प्रपोज केलं आहे. दरम्यान, सचिव जींना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. मग सचिव जी रिंकी की MBA... कुणाला प्राधान्य देणार?
सीरीजमध्ये इमोशन्स, रोमान्स आणि भरपूर कॉमेडी देखील आहे. इमोशनल स्टोरी टेलिंग आणि स्क्रीनप्लेमध्ये पंचायत तुम्हाला हसवते आणि रडवते देखील. तर काही वेळा विजय पराभवापेक्षाही अधिक दु:ख देते.’
२०२० मध्ये पंचायत सीजन १ मध्ये रिंकी-सचिव जी यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. रिंकी-सचिव जी पहिल्यांदा पंचायत ऑफिस जवळ पाण्याच्या टाकीवर भेटले होते. याठिकाणी रिंकी लपून छपून चहा पिण्यासाठी येते या पहिली भेटीत दोघांच्या मध्ये प्रेमाला सुरुवात होते., ही काहीणी प्रेक्षकांना आवडते.
दुसऱ्या सीजनमध्ये रिंकी आणि सचिव जी काम करण्याच्या बहाण्याने एकमेकांना भेटतात. कधी रिंकी आपली अडचण घेऊन सचिव जीकडे जाते. तर कधी सचिव जी, प्रधान जींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. यातूनचं दोघांमध्ये ॲट्रॅक्शन वाढतं. पण ते कधीही आपल्या भावना व्यक्त करत नाहीत.
तिसऱ्या सीजनमध्ये दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि फोनवर त्यांची बातचीत देखील सुरु झाली होती. आता फुलेराच्या तापलेल्या राजकीय वातावरणात रिंकी-सचिव जी यांची लव्ह स्टोरी पुढे गेली आहे.