series Panchayat Season 4 Online Leak
मुंबई - पंचायत ४ ची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर वेब सीरीज 'पंचायत ४' रिलीज झाली. रिलीज होताच ही वेबसीरीज ऑनलाईन लीक झाली. त्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रात्री १२ वाजता ही सीरीज रिलीज करण्यात आली. सीरीज रिलीज होताच सोशल मीडियावर रिव्ह्यू देखील पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया युजर्स एक्स अकाऊंटवर सीरीजमुळे फर्स्ट रिव्ह्यू देखील समोर येत आहेत. अनेक युजर्स ही सीरीज ऑनलाईन लीक होण्याचा दावा करत आहे.
चंदन कुमार द्वारा लिखित, दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, संविका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक, सुनीता राजवार आणि पंकज झाने मुख्य भूमिका साकारली आहे.
रिव्यू सोबतच डाऊनलोड लिंक्स देखील शेअर करत आहेत. एका युजरने पोस्ट शेअर करून दावा केला आहे की, त्याच्याकडे चांगल्या क्वॉलिटी असणारे फ्री लिंक्स आहेत. इथून सीरीजला चांगल्या क्वॉलिटी सोबत फ्रीमध्ये डाऊनलोड करून पाहिलं जाऊ शकतं. पोस्ट समोर आल्यानंतर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय. लोक लिंकची मागणी करत आहेत. असे अनेक पोस्ट एक्सवर शेअर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सीरीज ऑनलाईन लीक होण्याचा दावा केला जात आहे.
पायरेसी साईटवर २४०p ते HD पर्यंत अनेक रिझॉल्यूशनमध्ये उपलब्ध आहे. ही सीरीज पायरेसी साईट तमिळ रॉकर्सवर फ्रीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. लोक पंचायत ४ HD डाऊनलोड, पंचायत ४ तमिळरॉकर्स आणि पंचायत ४ फ्री डाऊनलोड सर्च सोबत फ्रीमध्ये डाऊनलोड करत आहेत.
ॲमेझॉन प्राईमची हिट वेब सीरीज ‘पंचायत’चा चौथा सीझन सोशल मीडियावर पसंतीस उतरत आहे. सीरीज मध्ये ‘फुलेरा’चे सरकार बदलते. सीरीजमध्ये इमोशन, रोमान्स सोबत जबरदस्त कॉमेडी देखील आहे. एका यूजरने याला मास्टर क्लास म्हटलं आहे. सिनेमाची एक संस्था अशीही प्रतिक्रिया आणखी एकाने दिलीय.