Deepa Parab movie Fakireeyat | 'फकिरीयत' हिंदी चित्रपटात दिसणार दीपा परब, मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री

Deepa Parab movie Fakireeyat | 'फकिरीयत' हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री दीपा परब, संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन अभिनेत्री
image of Deepa Parab Chaudhari
Deepa Parab Chaudhari in Hindi movie Fakireeyat Instagram
Published on
Updated on

Deepa Parab Chaudhari lead role in Hindi movie Fakireeyat

मुंबई - मराठी अभिनेत्री दीपा परब हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. आता दीपा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. 'फकिरीयत' या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपी च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आजवर मराठी सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी प्रथमच हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'फकिरीयत' हा त्यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी सिनेमा आहे. कोणतीही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारण्याची कला अंगी असलेल्या दीपा परबने यापूर्वी हिंदी सिनेमात काम केले होते. एका प्रदीर्घ ब्रेकनंतर ती पुन्हा हिंदी भाषिक रसिकांसमोर येणार आहे.

image of Deepa Parab Chaudhari
Panchayat 4 | ‘पंचायत’मधील मंजू देवीची भूमिका नीना गुप्ताला कशी मिळाली?

दरम्यानच्या काळात तिने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'फकिरीयत'मध्ये रसिकांना तिच्या अभिनयाचे वेगळे पैलू पाहायला मिळणार आहेत. 'फकिरीयत' हा चित्रपट एक युगपुरुष, महापुरुष, महावतार बाबाजी व त्यांचा क्रियायोग यांची खरी ओळख सांगणारा आहे. बाबाजींच्या एका शिष्येच्या माध्यमातून या सिनेमाची कथा उलगडत जाणार आहे, जी आपले जीवन गुरु इच्छेने जगते, गुरुकार्य जीवनाचे ध्येय समजते, तिला होणारी दैवी दर्शने, येणारे आदेश, होणारा विरोध, तिचा संघर्ष अशा अनेक अद्भुत, अविश्वनीय, रहस्यमय घटना म्हणजे फकिरीयत.

image of Deepa Parab Chaudhari
Gautami Patil Sundara Song | अखेर रिलीज झालं गौतमी पाटीलचं गाणं “सुंदरा”, निक शिंदेची युनिक हुकस्टेप

‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर आधारित कथा असलेल्या या चित्रपटाचे पटकथालेखन अनिल पवार यांनी केले आहे. संवादलेखन अनिल पवार आणि अनुजा जानवलेकर यांनी केले आहे. अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. समृद्धी पवार यांनी लिहिलेली गीते संगीतकार प्रवीण कुंवर यांनी मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटात दीपा परब, विनीत शर्मा, संतोष जुवेकर, उदय टिकेकर, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनिशा सबनीस आदी कलाकार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news