पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी हीची मुलगी पलक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय असते. गतवर्षी तिचा 'बिजली बिजली' हा म्युझिक व्हिडीओही लोकप्रिय झाला होता. 'रोझी ः द सॅफ्रॉन चॅप्टर' या हॉरर सस्पेन्स चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासही सज्ज आहे. शिवाय माय-लेकी विविध व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड करून अपडेटस् देतच असतात. पलक आता तिच्या डिनर डेटमुळे चर्चेत आली आहे.
पलक आणि सैफ अली खान-अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम हे कपल मुंबईत डिनरडेटवर भेटले. दोघांनी फोटोग्राफर्सना पाहून चेहरे लपवले. याचे फोटो, व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यानंतर बी-टाऊनच्या या नव्या कपलची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता हे दोघे डेट करत आहेत, अशीही चर्चा आहे. दरम्यान, इब्राहिम सध्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी'या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शनाचे काम करत आहे. करणच इब्राहिमला अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये लाँच करण्याचीही शक्यता आहे.
video- viralbhayani instaवरून साभार