Ankit Mohan | तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ दर्शवणार 'पैलवान’

Ankit Mohan | गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील पैलवान गाणं प्रदर्शित
Pailwaan song
गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील पैलवान गाणं प्रदर्शित झालेinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाीन डेस्क - बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पुण्यात पार पडला. अभिनेता अंकित मोहन, अभिनेता भूषण शिवतारे, आणि बालकलाकार शंभूने या सोहळ्याला हजेरी लावली. या गाण्यात अंकित मोहन सोबत भूषण शिवतारे, ८२ वर्षीय ज्येष्ठ हिंद केसरी दीनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे झळकले आहेत. हे गाणं गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून ब्रम्हा यांनी या संगीतबद्ध केलं आहे. गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. दिग्दर्शन मनीष महाजन, निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी केली आहे. (Ankit Mohan)

या गाण्याच्या संगीत अनावरण सोहळ्याला क्रीडाविश्वातील ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे, एम ओ वीचे भारत तायक्वांदो-अध्यक्ष नामदेव शिरगावकर, ज्ञानचंद पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू/रेफरी स्मिता शिरोळे, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन खजिनदार ॲड. धनंजय भोसले, सोपान कटके, फिजिओथेरपिस्ट डॉ.संदीप चौधरी, अविनाश सोलवट तसेच कलाकार विशाल फाळे, अनुश्री माने, विश्वास पाटील, दिग्दर्शक अभिजीत दानी हे उपस्थित होते.

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड अश्या मराठमोळ्या सिनेमांमध्ये आपल्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अंकित मोहन पैलवान गाण्याविषयी सांगतो, "मला असं वाटतं माझ्या नशिबातचं पैलवानाची भूमिका करणं होतं. मी बिग हिट मीडियाचे आभार मानतो. की त्यांनी मला पैलवान गाण्यात काम करण्याची संधी दिली. सेटवर सर्व कुस्तीपटूंसोबत शूट करताना एक सकारात्मक ऊर्जा मिळाली." पुढे तो शूटींगचा एक किस्सा सांगताना म्हणाला, "गाण्याचं शूट ५ दिवस पुण्यात होतं. रेड अलर्ट असतानाही आम्ही तिथे शूट केलं. निसर्गाचा चमत्कार म्हणजे आम्ही इन डोअर शूट करताना पाऊस पडत होता. आणि आऊट डोअर शूट करताना २ दिवस सलग ऊन होतं. मला वाटतं देवाच्या मनात हे गाणं संपूर्ण शूट व्हावं असं होतं. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता हे गाणं लोकांच्या मनावर अधिराज्य करेल हे निश्चित आहे."(Ankit Mohan)

शिवरायांचा छावा, रांगडा, सुभेदार अशा सिनेमांमधील अभिनेता भूषण शिवतारे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, "तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ मी लहानपणापासून खेळतो. मी स्वत: पैलवान आहे. आपल्या तांबड्या मातीतले रांगडे पैलवान कसे आहेत हे या गाण्यामार्फत दर्शवले आहे. मी ज्या खेळात पारंगत आहे तीच कुस्तीवीराची भूमिका माझ्या वाट्याला आली. यातच मला समाधान आहे."

Pailwaan song
'दुर्गा'च्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाचा खरा सूत्रधार कळणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news