पुढारी ऑनलाईन डेस्क - 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'दुर्गा' ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत नुकताच दुर्गा आणि अभिषेकचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतरही दुर्गाने आपल्या खऱ्या ओळखीचा अद्याप खुलासा केलेला नाही. पण दुर्गाची खरी ओळख अभिषेकच्या आईला म्हणजेच रेवती मोहितेंना मात्र माहिती आहे. अशातच आता मालिकेच्या आगामी भागात रेवती मोहिते याबद्दल दुर्गाला कबुली देताना दिसून येतील. मालिकेत दुर्गाचं सत्य कसं उघड होणार आणि त्याचा परिणाम कसा होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल.
'दुर्गा' मालिकेच्या या आठवड्यात रेवती केलेल्या वाईट कृत्याची दुर्गासमोर कबुली देणार आहे. "आता मला काही फरक पडत नाही?", असं म्हणत रेवती दुर्गाला दरीत ढकलताना दिसणार आहे. आता दुर्गा यातून कशी बाहेर पडणार? दुर्गाच्या मागे देवीआई उभी राहणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
दुर्गाच्या नशिबात आजवर अनेक संकटे आली आहेत. यापुढेही तिच्या संकटांची मालिका सुरूच आहेत. लग्नानंतरही रेवती मोहिते दुर्गाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. 'दुर्गा'च्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाचा खरा सूत्रधार आता कळणार आहे. दुर्गा अभिषेकला कधी सत्य सांगणार? मालिकेच्या आगामी भागात कोणता ट्विस्ट येणार? दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात काही परिणाम होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
लग्नाआधी सुडाचा विचार करणारी दुर्गा लग्नानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दादासाहेब मोहितेंशी कसा बदला घेणार? हे जाणून घेण्यासाठी 'दुर्गा' ही मालिका नक्की पाहा.