Pahalgam Attack | दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये फिरायला गेले होते 'हे' टीव्ही स्टार

Dipika Kakar-Shoaib Ibrahim in Pahalgam | शोएब-दीपिका कक्कड यांनी पहलगाम हल्ल्यानंतर महत्त्वाची माहिती दिली आहे.
Pahalgam Terror Attack Dipika Kakar-Shoaib Ibrahim
शोएब-दीपिका कक्कड यांनी पहलगाम येथे भेट दिली होतीInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यापूर्वी टीव्ही स्टार कपल शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड दोघेही तिथेच फिरायला गेल्याचे स्वत: या कलाकारांनी सांगितले. सुदैवाने त्यांना कोणतेही नुकसान झाले नाही. हल्ल्यानंतरची अपडेट त्यांनी दिलीय. काश्मीरमधील पहलगाम येथे दोघांनीही भेट दिली होती. त्यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. काश्मीर फिरायला गेलेल्या या कपलने व्लॉगच्या माध्यमातून शेअर केले होते. आज पहलगाममध्ये हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्वजण चिंतेत आहेत. शोएबने फॅन्ससाठी एक पोस्ट शेअर केलीय आणि सर्व अपडेट्स दिलीय.

काय म्हणाले शोएब इब्राहिम-दीपिका कक्कड?

पहलगाममधील हल्ल्यानंतर टीव्ही अभिनेता शोएबने एक पोस्ट शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांनी फॅन्सना अपडेट शेअर केलीय. ते म्हणाले- 'आम्ही कश्मीरमधून निघालो.'

शोएब इब्राहिमने लिहिलं-

शोएब इब्राहिम - दीपिका मागील काही दिवसांपासून व्हेकेशनवर आहेत. दोघे काश्मीरमध्ये आपल्या मुलासोबत आणि फॅमिली सोबत एन्जॉय करत होते. मागील काही दिवसांपूर्वी दोघांनी पहलगाममधून एक व्लॉग देखील शेयर केलं होतं. आता हल्ल्यानंतर त्यांचे फॅन्स दोघांच्या सुरक्षेवरून चिंतेत पडले आहेत. त्यानंतर शोएबने एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, ते सुरक्षित आहेत. चिंता करू नका. शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने लिहिलं की, ‘आम्ही सर्वजण आता सुरक्षित आहे, आज सकाळीच काश्मीरहून निघालो आहे.’

अधिक वाचा - 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news