

पुढारी ऑनलाईन डेस्क - पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलीवूड ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमार ते अनुपम खेरपर्यंत या हल्ल्यावर दु:ख जाहीर केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात १६ लोकांची पुष्टी झाली आहे. त्याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहे. पहलगाममध्ये झालेल्या या दुर्दैवी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार्स भडकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अक्षय कुमारने एक्सवर पोस्ट केलीय. 'ही बातमी ऐकून स्तब्ध आहे. या प्रकारे निर्दोष लोकांची हत्या करणे पाप आहे. त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करतो.'
अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हल्ल्याची निंदा केलीय. त्यांनी लिहिलंय - 'चूक, चूक, चूक. पहलगाम हत्याकांड!! शब्द आज नपुंसक आहे.'
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय- 'काश्मीरच्या पहलगाममध्ये बेगुनाह टूरिस्टवर भ्याड दहशतवादी हल्ल्याची निंदा करतो. सभ्य दुनियेत दहशतवादसाठी कोणतीही जागा असता कामा नये...ज्या परिवारांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्यासाठी माझ्या मनापासून संवेदना आणि जे जखमी झाले आहेत, ते वलकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.'
मन सुन्न करणारी घटना. शांती आणि सुंदरतेसाठी बनलेल्या ठिकाणी पर्यटकांना निशाणा बनवलं. पीडितांसाठी प्रार्थना.
गुरमीत चौधरी
दहशतवादाचा कोणताही धर्म असत नाही. दहशतवादी हिंदू वा मुसलमान नाही..तो केवळ एक दहशतवादी असतो. हे ईश्वर, पुढील जन्मी मला लांडगा बनव म्हणजे मी..त्यांचा चेहरा विद्रुप करू शकेन.
मनोज मुंतशिर