Paach Futaacha Bachchan: ‘आता धमाल होणार!’ ‘पाच फुटाच्या बच्चन’चा धडाकेबाज टीझर रिलीज; किर्तनाचा सूर अन् मनोरंजनाचा जबरदस्त तडका

Paach Futaacha Bachchan Teaser Releas: ‘पाच फुटाचा बच्चन’ या आगामी मराठी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातून विनोद आणि मनोरंजनाची भन्नाट झलक पाहायला मिळत आहे.
Paach Futaacha Bachchan Teaser Releas
Paach Futaacha Bachchan Teaser ReleasPudhari
Published on
Updated on

Paach Futaacha Bachchan Teaser Releas: ‘पाच फुटाचा बच्चन’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक कौस्तुभ रमेश देशपांडे यांच्या या चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये मनोरंजन आणि किर्तनाच्या सुरांची अनोखी सांगड पाहायला मिळत आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’ या नावामुळेच या चित्रपटाची उत्सुकता वाढली असून, टीझरमधूनही चित्रपटाचा वेगळा आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. किर्तनाचा सूर, त्याला जोडलेला विनोद आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल, अशा धाटणीचा असल्याचे टीझरवरून दिसून येते.

चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, किशोर कदम, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वानवे आणि श्यामराज पाटील यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटातील विनोद आणि कथानकाला कलाकारांच्या अभिनयाची चांगली साथ मिळणार असल्याचे स्पष्ट होते.

Paach Futaacha Bachchan Teaser Releas
Hanuman Ansh: पहिले 16 दिवस कमाई थंड, मग अचानक पडला कोटींचा पाऊस! ‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, किती कोटी कमावले?

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. राहुल कार्निक आणि ऑर्फीस स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील गाणी प्रदीप आवटे यांनी लिहिली आहेत.

‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एए फिल्म्स (AA Films) या चित्रपटाचे देशभरात वितरण करणार आहे. आता टीझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रत्यक्ष चित्रपटात नेमकी काय धमाल पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news