

Operation Sindoor Fawad Khan-Mahira Khan-Hania Amir Reactions
नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. बुधवारी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला. पण ही गोष्ट पचनी न पडलेल्या पाकिस्तानच्या कलाकारांनी भडास काढली आहे. अभिनेत्री माहिरा खान आणि अभिनेता फवाद खान यांनी इन्स्टाग्राम स्टोरी लावून काय म्हटलंय पाहा...
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम संपूर्ण पाकिस्तानावर पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने भारतीय चित्रपटात काम केलं आहे. पण आता ती निषेध नोंदवत आहे.
माहिरा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलं आहे. तिने म्हटलयं - 'वास्तवात..!!! परमेश्वर आमच्या देशाचे संरक्षण करो...'
माहिराने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं, 'मी खूप ऋणी आहे की मी अशा देशात राहते, जिथे मी काहीही करू शकते. माझ्याकडे आवाज आहे आणि मी त्याचा उपयोग करते. जेव्हा आमच्या स्वत:च्या जमीनीवर काही चुकीचं होतं..तेव्हा आम्ही बोलतो...पाकिस्तानला कोणत्याही पुराव्याशिवाय तत्काळ दोषी ठरवलं जातं...मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभव केलं आहे...'
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने इन्स्टा स्टोरीवर निषेध व्यक्त केलाय. निर्दोष लोक गेले...हे लज्जास्पद आहे...हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मारले गेलेल्या कुटुंबांच्या प्रति माझ्या खूप संवेदना आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या नातेवाईकांना ताकद मिळणयाची प्रार्थना करतो...'
अभिनेत्री हानिया आमिर म्हणाली- ''पहलगाम हल्ल्यानंतर मी कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा करताना पाहिलं नाही. परंतु, भारतीय या हल्ल्यात निर्दोष मृत्यूमुखी पडले, त्याचा जल्लोष करताना दिसत आहेत. माझ्याकडे शब्द नाहीत..माझ्याकडे राग, चीड आणि दुखवालेलं मन आहे...ही क्रूरता आहे...''
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ८ पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. अभिनेता फवाद खान आणि गायक आतिफ अस्लमसहित अन्य कलाकारांचे अकाऊंट बंद करण्यात आले आहेत.
काश्मीरधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अबीर गुलाल या चित्रपटाचे प्रदर्शन भारतात थांबवण्यात आले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरसोबत अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत होता.